बी. एस. पाटील; कुर्ली हायस्कूलमध्ये दिवाळी अंक वितरण
निपाणी (वार्ता) : वाचन न केल्याने लोकांमध्ये अज्ञानता पसरली आहे. लोक खरे ज्ञान मिळविण्याऐवजी व शांततेने वागण्याऐवजी सतत मोबाइलमध्ये गुंतून रहात आहेत. त्यातूनच विकृतीपणा वाढीस लागत आहे, असे मत कुर्ली हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक बी. एस. पाटील यांनी व्यक्त केले. कुर्ली येथील सिद्धेश्वर विद्यालयात वाचन प्रेरणा उपक्रम कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्याध्यापक एस. एस. चौगुले होते.
टी. एम. यादव यांनी स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. नागपूर येथील राजमाता जिजाबाई ग्रंथालय व वाचनालयाचे अध्यक्ष सुनील पाटील यांच्यामार्फत ३०० विद्यार्थ्यांना ‘साधना’ बाल दिवाळी अंकाचे वितरण करण्यात आले. एस. एस. चौगुले यांनी, वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी सुनिल पाटील यांचा दरवर्षी विद्यार्थ्यांना दिवाळी अंकाचे वितरण करण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तो उपयुक्त ठरत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमास एस. एस. साळवी, के. ए. नाईक, यु. पी. पाटील, ए. व्ही. पाटील, एम. बी. हिरूगडे, एम. एस. वाळके, व्ही. टी. साळुंखे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. एस. ए. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. ए. ए. चौगुले यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta