निपाणी (वार्ता) : त्रिपुरारी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर येथील आश्रय नगरातील कार्तिक स्वामी मंदिरामध्ये रविवारी (ता. २६) दुपारी ३:५३ ते सोमवारी (ता. २७) दुपारी १.३५ वाजेपर्यंत कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी मंदिर खुले राहणार आहे. या दर्शनाचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन कार्तिक स्वामी मंदिरातर्फे करण्यात आले आहे.
शहरामधील आश्रयनगर येथे कार्तिक स्वामी मंदिर उभारणीत परिसरातील स्त्री – पुरुष व युवकांचे योगदान महत्त्वाचे आहे. तरी कार्तिक स्वामी दर्शनासाठीनिपाणी वासियांना लाभ घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. कार्तिक स्वामी दर्शन हे कार्तिक महिन्यातील पौर्णिमेला कृतिका नक्षत्र असेल त्यावेळी घ्यावयाचे असते. ज्यांना शक्य आहे, त्या स्त्री-पुरुषांनी या दिवशी कार्तिक स्वामी दर्शन घेऊन पुण्य संपादन करावे. या महिन्यातील विशिष्ठ योगांवर त्यांचे दर्शन घेवून भक्तीभावाने दर्शन घ्यावे. रविवारी (ता.२६) सकाळी ११ वाजल्या पासून महाप्रसादाचे वाटप होणार आहे. सोमवारी (ता.२७) संध्याकाळी दीपोत्सवाचे आयोजन केले असून यावेळी कार्तिक दिप लावण्यासाठी भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta