कुर्ली हायस्कूलला आमदार निधीतून मदत
निपाणी (वार्ता) : शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास होत असतो. शालेय भौतिक विकास करण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील असल्याचे मत शिक्षक आमदार प्रकाश हुक्केरी यांनी कुर्ली येथील सिद्धेश्वर विद्यालय आरओ प्लॅन्ट मंजुरी पत्र वितरण कार्यक्रम प्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. अध्यक्षस्थानी स्कूल बेटरमेंट कमिटी अध्यक्ष अरुण निकाडे होते.
प्रभारी मुख्याध्यापक एस. एस. चौगुले यांनी स्वागत करून विद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला. माजी ग्राम पंचायत अध्यक्ष अमर शिंत्रे, श्रीनिवास पाटील, कुमार माळी, लक्ष्मण नेजे, विश्वनाथ पाटील यांनी विद्यालयासाठी आवश्यक सुविधा बाबत माहिती दिली.
आमदार हुक्केरी यांनी, पिण्याच्या पाण्यासाठी बोअरवेल व आरओ प्लॅन्टसाठी सिद्धेश्वर विद्यालयासाठी दहा लाख रुपये मंजूर केले आहेत. तसेच आमदार निधी व ग्रामस्थ देणगीमधून पंचवीस लाखात दोन खोल्यांचे बांधकाम मंजूर केले आहे. ते तात्काळ पूर्ण करून देण्याचे जाहीर केले. अरुण निकाडे यांनी विकास कामाला प्राधान्य देणारे आमदार म्हणून प्रकाश आण्णा हुक्केरी हे परिचित आहेत.त्यांनी ज्ञान मंदिरासाठी केलेली मदत ही अनमोल असल्याचे सांगितले.
याप्रसंगी हुन्नूरगी ग्रा.पं. माजी अध्यक्ष दादासाहेब पाटील, गोपी कागवाडे-एकसंबा, स्कूल कमिटी सदस्य रामचंद्र निकाडे, दिलीप पाटील, आप्पासाहेब लोकरे, शिवाजी चौगुले, नामदेव निकाडे, सीताराम चौगुले, सुभाष निकाडे, वकिल सुर्याजी पोटले, विलास पाटील, सुधाकर व्हराटे, बी. एस. हेरवाडे, आनंदा ढगे, राजेंद्र कोष्टी, सागर चौगुले, अजय पाटील, विपुल कमते, सुदीप वाळके, नितीन पाटील,सुरेश ढगे, सखाराम मगदूम, रोहन पाटील,दिगविजय पाटील, कृष्णात निकाडे, केदारी चौगुले यांच्यासह विद्यालयाचे आजी माजी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. टी. एम. यादव यांनी सूत्रसंचालन केले. ए. ए. चौगुले यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta