निपाणी (वार्ता) : येथील जुन्या पीबी रोडच्या रुंदीकरणांमध्ये साखरवाडी मधील प्राचीन मारुती मंदिर पाडण्यात आले होते. त्याचे नुकसान भरपाई मिळावी म्हणून मंदिर कमिटीने नगरपालिकेसह विविध अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. बऱ्याच वर्षाच्या प्रयत्नानंतर अखेर नगरपालिकेतर्फे २० लाखाची भरपाई देण्यात आली. त्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल माजी आमदार काकासाहेब पाटील यांचा मारुती मंदिर ट्रस्ट कमिटी तर्फे सत्कार करण्यात आला.
माजी नगराध्यक्ष चंद्रकांत जासुद यांनी, रस्ता रुंदीकरणांमध्ये मारुती मंदिर हटविण्यात आले होते. त्यामुळे त्याच्या जीर्णोध्दारा सह नूतनीकरणासाठी नगरपालिकेकडे नुकसान भरपाईची मागणी केली होती. त्यानुसार नगरपालिकेने २० लाख रुपये भरपाई दिली आहे. त्यासाठी माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. आता मंदिराचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून वर्षभरात हे काम पूर्ण होणार असल्याचे सांगितले.
यावेळी निपाणी भाग काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, माजी सभापती विश्वास पाटील, निकु पाटील, संजय साळवे, माजी नगरसेवक संदीप सावरकर, नवनाथ चव्हाण, संजय सूर्यवंशी, बाळासाहेब कमते, सुनील हिरुगडे, अतुल चावरेकर, विजय -हाटवळ, विकास गायकवाड, सुरज वाडकर, अरुण आवळेकर, निलेश वाडकर, शब्बीर माणगावकर यांच्यासह साखरवाडी समाजाचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta