यंत्रमागधारक असोसिएशनची मागणी ; तहसील, हेस्कॉम अधिकाऱ्यांना निवेदन
निपाणी (वार्ता) : राज्यात नवे सरकार अस्तित्वात आल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांची वीज बिले माफ केली आहेत. मात्र यंत्रमाग धारकांचे वीज बिल वाढवण्यात आल्याने व्यवसाय अडचणीत आला आहे. याबाबत सरकारला बऱ्याच वेळा निवेदन देऊनही दुर्लक्ष झाले आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वी ६ डिसेंबर पर्यंत वाढीव विज बिल मागे न घेतल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा कर्नाटक राज्य विणकर महासंघाचे राज्य अध्यक्ष शिवलिंग टिरकी यांनी दिला. निपाणी आणि चिकोडी भागातील यंत्रमागधारकांनी विविध मागण्यासाठी येथील तहसीलदार आणि हेस्कॉम काम कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले. त्याप्रसंगी टिरकी बोलत होते.
गेल्या सहा महिन्यापासून यंत्र माग धारकांना वाढीव दिले आली आहेत. त्यामुळे प्रति महिना ५० हजार रुपये येणारे बिल आता दोन लाखापर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे अनेक यंत्रमागधारक आत्महत्या करीत आहेत. याबाबत सरकारला वारंवार माहिती देऊनही त्यांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे अधिवेशनापूर्वीच वाढीव वीज बिल मागे घ्यावे अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा यंत्रमानधारकांनी दिल्याचे टिरकी यांनी सांगितले.
येथील अक्कोळ क्रॉस पासून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. धर्मवीर संभाजीराजे चौक, साखरवाडी, जुना पी.बी. रोड नगरपालिकामार्गे येथील तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर हेस्कॉम अभियंते अक्षय चौगुले व तहसीलदार कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी निवेदन स्वीकारले. वाढीव वीज बिल कमी करण्यासंदर्भात सरकारचा कोणताही आदेश आलेला नाही. आदेश येताच आपण वाढीव वीज बिल कमी करण्याची ग्वाही चौगुले यांनी दिली.
यावेळी मानकापूर पावरलूम असोसिएशनचे अध्यक्ष अध्यक्ष आनंदा कुंभार, शाहीर कुंभार, सुनील कुंभार, शुभम साळुंखे, अण्णाप्पा नागराळे, सोमनाथ परकाळे, भीमराव खोत, लक्ष्मण कदम, महावीर धरणगुत्ते, स्वप्नील कमते, रघुनाथ शेंडगे, लक्ष्मण दोनवाडे, येरगुंडी जीगन यांच्यासह निपाणी आणि चिकोडी तालुक्यातील यंत्रमागधारक उपस्थित होते.