साखरवाडी समाज अध्यक्ष चंद्रकांत जासूद : समाजाची बैठक
निपाणी (वार्ता) : येथील जुन्या पी.बी. रोडवरील मारुती मंदिर रस्ता रुंदीकरणांमध्ये गेले होते. त्यासाठी नुकसान भरपाई मिळावी यासाठी नगरपालिकेकडे माजी आमदार काकासाहेब पाटील यांच्यासह आपण मागणी केली होती. त्यानुसार केवळ नुकसान भरपाई साठी नगरपालिका प्रशासनाने २० लाखाची भरपाई दिली आहे. यापूर्वी माजी मंत्री व आमदारांनाही मंदिर जीर्णोद्धारासाठी देणगीची मागणी केली होती. त्यानुसार केवळ २० लाख रुपये मंजूर केले असताना ४० लाख रुपये दिल्याचे सांगत आहेत. हे चुकीचे असून केवळ श्रेयवाद सुरू असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष व साखरवाडी मराठा समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत जासुद यांनी दिली. बुधवारी (ता.२९) सायंकाळी आयोजित समाजाच्या बैठकीत ते बोलत होते.
चंद्रकांत जासूद म्हणाले, लोकप्रतिकडे मंजुर असतानाही तो देण्यासाठी विलंब का केला? यापूर्वी माजी मंत्री आमदार प्रकाश हुक्केरी यांनीही निधी मंजूर करून तो दिला आहे. नगरपालिकेच्या चुकीच्या धोरणामुळे यापूर्वी आलेला निधी परत गेला आहे. मात्र प्रकाश हुक्केरी यांनी ७५ लाखाचा निधी मंजूर करून तो दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केल्याने नुकसान भरपाईची रक्कम मिळाली आहे. कमिटीचे काही ट्रस्टी मयत झाल्याने निधी मंजूर होण्यास काही महिने लागले आहे आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार राष्ट्रीय म्हणून आपणाला जबाबदार धरले आहे. आता आलेल्या निधीमुळे वर्षभरात मारुती मंदिराचे बांधकाम पूर्ण होणार आहे. त्यामुळे साखरवाडी समाजाने एकत्र येऊन मंदिर बांधकामाला पाठिंबा दिला आहे. शिवाय समाजातील काही व्यक्तींनी देणगीही दिली आहे. त्यांच्या सहकार्यातून मंदिराचे काम पूर्ण होणार असल्याचे जासूद यांनी सांगितले.
माजी सभापती विश्वास पाटील यांनी, जात धर्म, राजकारणविरहित मंदिराचे बांधकाम चालू आहे. माजी मंत्री, आमदारधर्मादाय मंत्री असताना अनेक गावांमध्ये मंदिरासाठी अनेक गावात मंदिरासाठी निधी दिला. पण साखरवाडी येथील मारुती मंदिरासाठी विलंब का? असा सवाल व्यक्त केला. शिवाय मारुती मंदिर नुकसान भरपाई मिळत असताना त्यांनी आयुक्तावर दबाव आणल्याचे सांगितले.
यावेळी प्रशांत नाईक, अनिल रेपे, शिरीष कमते, सुरेश बोरगावे, बाबासाहेब तिप्पे, सुनील राऊत, सुनील हिरूगडे, संदीप येरुडकर, बाळासाहेब कमते, धीरज वाडकर, विजय -हाटवळ, नवनाथ चव्हाण, आकाश खवरे, आकाश कुंभार, गणेश गायकवाड, उत्तम कामते, श्री भराडे, सागर कुंभार, महेश पोवार, शिवाजी इंदलकर, किरण खडके यांच्यासह साखरवाडी समाजाचे नागरिक उपस्थित होते.