निपाणी (वार्ता) : कणगला येथे श्री महालक्ष्मी मंदिरामध्ये कार्तिक दीपोत्सव कार्यक्रम झाला. अरविंद कमते यांनी स्वागत केले. त्यानंतर मंदिरातील देवीची श्रीमंत सम्राज्यलक्ष्मीराजे निपाणकर यांनी ओटी भरून आरती करण्यात आली.श्रीमंत दादाराजे निपाणकर यांच्या हस्ते समईचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी भाविकांनी महालक्ष्मी मंदिर परिसरामध्ये ठेवलेल्या शेकडो पणत्या लावून मंदिर परिसर उजळून टाकला. यावेळी नरसिंह सरस्वती मंदिरामध्ये देखील दिपोत्सव झाला. श्रीमंत दादाराजे निपाणकर, श्रीमंत युवराज सिद्धोजीराजे निपाणकर यांचा श्रीधर कमते, धर्मराज कमते यांच्या हस्ते सत्कार झाला. भारती खवणे यांनी श्रीमंत समराज्यलक्ष्मीराजे यांची ओटी भरून ओटी भरली. कार्यक्रमास बंडू कमते, संजय कमते, कमते गुरुजी, शंकर तेली, मोहन पाटील, आदित्य कमते, सुजित गायकवाड, रेखा गुरव, साक्षी पाटील, भारती कमते, साधना चव्हाण, इंदुबाई पाटील, नीला गोखले, शुभांगी हातरोटे, रेखा कुंभार, ऋतंबराराजे , पद्मराज कमते, शशिकांत गुरव. सुनील तेली, प्रकाश तेली, जीनराज कमते, चिदानंद खवणे, राजू मोहिते, राघवेंद्र कमते, सुदर्शन कमते, सुशांत कमते,महावीर पाटील,
यांच्यासह भाविक उपस्थित होते. यावेळी प्रसादाचे वाटप करण्यात आले.