राजू पोवार; निपाणी तालुका पदाधिकाऱ्यांच्या निवडी
निपाणी (वार्ता) : शेतकऱ्यांच्या पिकाला खर्चाच्या तुलनेत दर मिळावा, अतिवृष्टी पूर परिस्थिती काळातील नुकसान भरपाईसह शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी रयत संघटना कार्यरत आहे. या पुढील काळात संघटना आणखीन मजबूत करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी केले. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी निपाणी तालुका अध्यक्षपदी बंटी पाटील, कार्याध्यक्षपदी मधुकर पाटील- हदनाळ, कारदगा जिल्हा पंचायत अध्यक्षपदी एकनाथ सादळकर, तालुका उपाध्यक्षपदी बबन जामदार, शिवाजी वाडेकर, संजय नाईक, ईश्वरा कुंभार, पिंटू लाड, शब्बीर मुजावर, चिनू कुळवमोडे, बाबासाहेब पाटील यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी झाल्या. त्यानंतर सर्वच पदाधिकाऱ्यांना निवडीची पत्रे देण्यात आली.
यावेळी आत्माराम राऊत, बाबासाहेब सूर्यवंशी, शिवाजी नामदेव साळुंखे, विलास पाटील, चेतन पाटील, मयूर पोवार, सुभाष खोत, अण्णाप्पा बन्ने, विजय मंगावते, संदीप जोके, नितीन कानडे, पायगोंडा पाटील, रोहन नलवडे, राजू पाटील, यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta