निपाणी (वार्ता) : येथील स्मशान मारुती आणि आदर्श नगरातील शनि मंदिरामध्ये कार्तिक दीपोत्सव पार पडला. स्मशान मारुती मंदिरात श्रीमंत दादाराजे निपाणकर यांच्या हस्ते समई पूजन करून कार्तिक दीपोत्सव सुरू झाला. यावेळी मंदिर परिसरात भाविकांनी रांगोळ्या रेखाटल्या होत्या. भक्तांनी मंदिर परिसरामधील ठेवलेल्या पणत्या लावून मंदिर परिसर उजळून टाकला.
यावेळी भक्तांना प्रसाद व दूध वाटप करण्यात आले. कार्यक्रमास देवदास कागीनकर, सुहास भगत, महादेव घाडगे, सुनील अब्दागिरे, मारुती लोहार, राहुल ताडे, अमोल भोसले, अभिजीत कागीनकर, राजेंद्र भगत, सुरेश मुंडे, सुरेश पाटील, निलेश पोळ, सुजित गायकवाड, संतोष स्वामी, युवराज पाटील, सुरेश जाधव, संजय कांबळे, पप्पू माने, आकाश गाडीवड्डर, संतोष मातीवड्डर, सुरेश माळगे, राजेंद्र भगत यांच्यासह भाविक उपस्थित होते.
येथील आदर्श नगरातील शनी मंदिरात कार्तिक दीपोत्सव साजरा करण्यात आला. भाविकांनी ५०० दिवे प्रज्वलित केल्याने मंदिर परिसर उजळून निघाला.
मंदिर कमिटीच्या विश्वस्त प्रमिला रुडगी यांनी स्वागत केले. निरंजन बोरगावे यांच्या पौरोहित्याखाली मूर्तीस अभिषेक झाला. नगरसेविका कावेरी मिरजे, सागर मिरजे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. तत्पूर्वी श्रींची आरती करण्यात आली.
यावेळी प्रकाश बाडकर, नवीन बाडकर, ऍड. एस. एस. चव्हाण, गजानन चौगुले, राजू जाधव, प्रमोद सुतार, सतीश रुडगी, प्रकाश बोरगावे यांच्यासह भाविक उपस्थित होते.