निपाणी (वार्ता) : बोळेवाडी (ता. निपाणी) येथील प्रगतिशील शेतकरी प्रकाश गायकवाड यांना राज्यस्तरीय लोकराजा शाहू कृषीभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. शासकीय सेवेतून निवृत झाल्यानंतर आपल्या सहा एकर जमिनीत त्यांनी फुलशेती केली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन इचलकरंजीतील लोकराजा शाहू छत्रपती चॅरिटेबल ट्रस्टतर्फे हा पुरस्कार जाहीर झाला आहे. २१ आणि २२ रोजी आयोजित महोत्सवात या पुरस्काराचे वितरण होणार आहे.