विद्यार्थ्यांचा प्रतिसाद; गावातही केली जनजागृती
निपाणी (वार्ता) : सध्या वापरात असलेले प्लास्टिक मानवी जीवनासह पशु पक्षासाठी घातक आहे. त्यामुळे शासनाने प्लास्टिक मुक्त शाळा राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार निपाणी पासून जवळच असलेल्या यरनाळ शाळेने मुख्याध्यापक श्रीकांत तावदारे यांच्या नेतृत्वाखाली प्लास्टिक मुक्त शाळेचा उपक्रम राबविला. त्यांच्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. शिवाय विद्यार्थी व शिक्षकांनी गावामध्ये प्लास्टिक बाबत जनजागृती केली. त्यांच्या या उपक्रमाचे निपाणी परिसरातून कौतुक होत आहे.
कर्नाटक शासनाने शाळेत प्लास्टिक मुक्तीचा उपक्रम राबविण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार शाळेमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी वापर होणाऱ्या प्लास्टिक बाटल्याबाबत मुख्याध्यापक तावदारे यांनी मार्गदर्शन केले. याशिवाय विद्यार्थ्यांनी येणार गावांतील रस्त्यावर पडलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या संकलित केल्या. शिवाय ग्रामस्थांना या पुढील काळात जातीच्या बाटल्या न वापरण्याचे आवाहन विद्यार्थ्यांनी केले. त्यांच्या या उपक्रमाला ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला. तसेच यापुढील काळात प्लास्टिक बाटल्या आणि कॅरीबॅग वापरणार नसल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या.
यावेळी यु. एन. कांबळे, एस. एस. पाटील, एन. ए. सकपाळ, व्ही.व्ही. धारव, एस. एस. शिंदे, जी. आर. मजलट्टी, दिग्विजय निंबाळकर, राजेंद्र घाटगे, जोस्ना घाटगे, नामदेव सावकार, जे.डी. देसाई, अतुल खामकर, माया कांबळे, उज्वला कांबळे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी व एसडीएमसी पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta