
वाहनधारकासह नागरिकांची गैरसोय
निपाणी (वार्ता) : यरनाळ येथील दोन गल्लीमध्ये सहा महिन्यापूर्वी रस्त्याचे डांबरीकरण झाले आहे. पण तिसऱ्या गल्लीतील बापू कुंभार ते गजानन परीट व नवीन ग्रामपंचायत कार्यालय ते रघुनाथ मोहिते यांच्या घरापर्यंत रस्त्याचे काम रखडले आहे. त्यामुळे नागरिकासह वाहनधारकांची गैरसोय होत असल्याने या रस्त्यांचेही डांबरीकरण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
बऱ्याच वर्षांपूर्वी वरील दोन रस्ते करण्यात आले होते. अलीकडच्या काळात त्या रस्त्यांची दुरावस्था झाली असून नागरिकांना ये-जा करणे कठीण होत आहे. गावात यापूर्वी केलेल्या दोन रस्त्याप्रमाणे त्या रस्त्यांचेही डांबरीकरण करून नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्याची मागणी किसन देसाई, दिनकर लकडे, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र घाटगे, नेताजी पोवार, आवबा पोवार यांच्यासह गल्ली क्रमांक तीन मधील नागरिकांनी केली आहे. याबाबत वरील नागरिकांनी माजी आमदार काकासाहेब पाटील यांची भेट घेऊन रस्त्याचे डांबरीकरण करण्याबाबत निवेदन दिले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta