ग्रामपंचायतची मागणी; मंत्री दिनेश गुंडुराव यांना निवेदन
निपाणी (वार्ता) : अक्कोळसह, पडलीहाळ, जत्राट, ममदापूर कोडणी, लखनपूरसह ११ गावांचा अक्कोळ प्राथमिक केंद्रामध्ये समावेश आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रात २४ तास वैद्यकीय सेवा सुरू करण्याची महत्त्वाची गरज आहे, अशा आशयाचे निवेदन राज्याचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडराव यांना बेळगाव येथे भेटून ग्रामपंचायतीच्या वतीने निवेदन देण्यात आले.
निवेदनातील माहिती अशी, अक्कोळ प्राथमिक आरोग्यकेंद्रात यापूर्वी २४ तास सेवा उपलब्ध झाली होती. मात्र ही सेवा बंद असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. शिवाय रुग्णांना खाजगी दवाखान्यात उपचार घेण्यासाठी आर्थिक भुर्दंड बसत आहे.गावच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून या दवाखान्यांमध्ये तात्काळ पूर्वीप्रमाणे सेवा सुरू करावी.
मंत्री दिनेश गुंडराव यांनी या संदर्भात जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधून मागण्यांचा पाठपुरावा करून ही समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
यावेळी पालकमंत्री जारकीहोळी, चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, ग्रामपंचायत अध्यक्ष युवराज पाटील, सदस्य संपत स्वामी, इंद्रजीत सोळांकुरे, महादेव वाडकर, समीर मगदूम, राजेंद्र सुतार, श्रीकांत कोळी, सुरेश मोहिते, विश्वास कुंभार, रामा बन्ने, चंद्रकांत मुधाळे, अनिल पाटील, बाबासो घस्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta