12 हजारांचे उद्दिष्ट : आठवड्याभरात केवळ 40 टक्के लसीकरण
निपाणी (वार्ता) : आरोग्य विभागाच्या वतीने 15-18 वयोगटातील शाळाकरी विद्यार्थ्यांना लसीकरणाचा उपक्रम हाती घेतला आहे. कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने शासनाने शाळा बंदीचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. बेळगाव जिल्ह्यात अद्याप असा आदेश काढण्यात आला नसला तरी येत्या काही दिवसात त्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचा लसीकरणावर परिणाम होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे निपाणी भागातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
निपाणी तालुक्यात 12 हजार 400 विद्यार्थ्यांना लसीकरणाचे उद्दीष्ट ठेवण्यात आले. आता पर्यंत 40 टक्के लसीकरण करण्यात आले असून विद्यार्थ्यांच्या लसीकरणावर शाळाबंदीचे सावट गडद होतांना दिसून येत आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता 15-18 वयोगटातील शाळाकरी विद्यार्थ्यांना कोव्हॅक्सीन देण्याचा प्रारंभ गत आठवड्यात झाला. त्यासाठी तालुक्यातील शाळांसह प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लसीकरण केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. प्रत्येक लसीकण केंद्रावर रोज 100ते 140 डोस उपलब्ध होत आहेत. तर वेळेप्रसंगी आवश्यकता भासल्यास आणखी लससाठा उपलब्ध करून देता येईल, अशी व्यवस्था करण्यात आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे. आतापर्यंत विद्यार्थ्यांनी 9 शाळांमधून लस टोचून घेतली आहे. उर्वरित शाळांमध्ये अद्याप लसीकरण झालेले नसताना आता शाळा बंदीचे आदेश राज्य शासनाने काढल्यास पुन्हा लसीकरणात खोडा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
—
गर्दी टाळण्यासाठी नियोजन शाळा बंदीचे राज्यशासनाचे निर्देश येण्याची शक्यता असून त्या प्रमाणे आरोग्य विभागाच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे. विद्यार्थी प्रौढ नागरिकाच्या लसीकरण केंद्रावर जाऊ नये, यासाठी विद्यार्थांसाठी खास शाळेतच लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तशा सुचना तालुकास्तरावर देण्यात आल्या असून बीएचओ आणि टीएचओ यांच्या समन्वयातून लसीकरण पुर्ण करण्यात येणार आहे.
—
’विद्यार्थ्यांना कुठल्याही परिस्थीतीत प्रौढ, नागरिकांच्या लसीकर केंद्रावर लसीकरण न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मागणी नुसार लसीचा पुरवठा करण्यात येणार आहे. येत्या चार पाच दिवसात उद्दीष्ठ पुर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पालकांनी आपल्या 15-18 वयोगटातील पाल्यांचे तातडीने लसीकण करूण घ्यावे.
– डॉ. व्ही. व्ही. शिंदे, तालुका वैद्यकीय अधिकारी, चिक्कोडी.
Check Also
गट, तट विसरून शेतकऱ्यांनी एकत्रित यावे
Spread the love राजू पोवार; विधानसभेवरील मोर्चाबाबत जत्राट मध्ये बैठक निपाणी (वार्ता) : दोन वर्षापासून …