
माजी आमदार काकासाहेब; बोरगावमध्ये गुणवंतांचा सत्कार
निपाणी (वार्ता) : बालपणापासून घेऊन शिक्षण ते तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. मराठा समाजाच्या युवक युतींमध्ये शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी समाजाचे पदाधिकारी प्रयत्न करीत आहेत. उच्च पदावर पोहोचण्यासाठी सर्वांचे मोठे योगदान आहे.आधुनिक युगात शिक्षणाचे महत्त्व सर्वांनी जाणून घ्यावे. मराठा समाज एकसंघ होण्यासाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक आहेत, असे माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी केले. बोरगाव येथे आयोजित मराठा समाजाच्या गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ प्रसंगी काकासाहेब पाटील बोलत होते.
काकासाहेब पाटील म्हणाले, शिक्षण असेल तर आपण काहीही साध्य करू शकतो. समाजातील समस्या अन्नसाक्षरता, अंधश्रद्धा दूर होऊन उत्तम समाज निर्मितीसाठी प्रयत्न करूया. नाविन्यता आणि संशोधन हे आपले नैतिक कर्तव्य समजून सर्वांनी प्रयत्न करावे.
मराठा समाजाची विद्यार्थिनी पूर्वा निकम यांननी पीएचडी, मोहन पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार व शिवानी दबडे हीने बीएससी परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवून उत्तीर्ण झाल्याबद्दल समस्त मराठा समाजातर्फे काकासाहेब पाटील यांच्या हस्ते सत्कार झाला.
यावेळी मलिकवाडचे बाळासो पाटील, शंकरदादा पाटील, अनिल माने, सोनू कदम, प्रकाश कदम, अशोक हेगडे, विलास लोखंडे, तानाजी बेलवडे, संजय चौगुले, जितेंद्र चेंडके, शिवाजी निकम, वरून कुलकर्णी, रामचंद्र पाटील, नायकु भोसले, अजित माळी, मारुती निकम, बाबासो निकम, अण्णासो पवार, नरसू गोटखिंडे, एस. बी. पाटील, राजू वास्कर, बाळू गोटखिंडे यांच्यासह मराठा समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते. ओंकार गोटखिंडे यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta