
निपाणी (वार्ता) : आडी (ता. निपाणी) येथील संजीवनगिरी वरील श्री दत्त देवस्थान मठाच्या वतीने दत्त जयंती निमित्ताने परमाब्धि विचार महोत्सवाचा शुभारंभ सकाळी ७ वाजून २५ मिनिटाने परमपूज्य परमात्मराज महाराज आणि देवीदास महाराज यांच्या हस्ते कलश व वीणा पूजनाने झाला.
सकाळी श्री गुरु दत्तात्रेयांच्या चरणी अभिषेक अर्पण करून पूजा व महाआरती करण्यात आली. यावेळी परमपूज्य परमात्मराज महाराज यांच्यासमवेत देवीदास महाराज, नामदेव महाराज, राम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, चिदानंद महाराज, समाधान महाराज, अमोल महाराज, मारुती महाराज, श्रीधर महाराज विविध आश्रमातील साधूसह असंख्य भाविकांनी महाआरतीचा लाभ घेतला.
परमाब्धि ग्रंथाचे पूजन करून, पारायणाला बसणाऱ्या भाविकांना संकल्प धागा बांधून पारायणाचा शुभारंभ करण्यात आला. ध्वजारोहणही करण्यात आले.
यावेळी पारायणामध्ये शेकडो भाविकांनी सहभाग घेतला आहे.
पारायणाचे नेतृत्व ज्ञानेश्वर महाराज,चिदानंद महाराज, नामदेव महाराज, श्रीराम महाराज यांनी केले. भजन आणि नामस्मरणाने पारायणाची सुरुवात झाली. यांच्यासमवेत तबलावादक महादेव मोरे, प्रवीण मोरे यांनी साथ संगत दिली. यावेळी विलास गुरव, शामराव घाटगे, के. डी. पाटील, वसंत पाटील, जगन्नाथ खोत, यशवंत दिवटे, महादेव कदम यांच्यासह आडी, बेनाडी, कोगनोळी, हंचिनाळ, सौंदलगा, हणबरवाडी, कागल, निपाणी, म्हाकवे परिसरातील शेकडो भाविक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta