
निपाणी (वार्ता) : बेळगाव मराठा मंडळ संचलित येथील मॉडर्न इंग्लिश स्कूल येथे वार्षिक स्नेहसंमेलन विविध उपक्रमांनी झाले. अध्यक्षस्थानी बेळगाव मराठा मंडळच्या अध्यक्षा डॉ. राजश्री नागराजू तर प्रमुख पाहुणे म्हणून नागराजू यादव, महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. प्रकाश हेरेकर, नदी बीएड कॉलेजचे प्राचार्य डॉ. आनंदमूर्ती कुलकर्णी, संस्थेचे संचालक दिलीप पठाडे उपस्थित होते.
प्रारंभी व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते रोपाला पाणी घालून स्नेहसंमेलनाचे उद्घाटन झाले. डॉ. प्रकाश हेरेकर यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला.
डॉ. आनंदमूर्ती यांनी, या शाळेने अभ्यासक्रमाबरोबरच इतर कलागुणांना वाव दिला जात आहे. त्यामुळे येथील विद्यार्थी जीवनात यशस्वी होतील, असे सांगितले.
गत वर्षी झालेल्या दहावी वार्षिक परीक्षेमध्ये यश मिळवलेल्या अमृता माने, प्रतीक पाटील, कार्तिक पाटील, सोनाली पाटील, शिवम कश्यप, अंकिता हेरवाडे, अनिरुद्ध कदम, अपेक्षा औडनकर, भक्ती चव्हाण, वैभवी पाटील, स्नेहा पटोळे व श्रावणी कुलकर्णी यांचा गौरव करण्यात आला. यंदाच्या वर्षातील आदर्श विद्यार्थी म्हणून संकल्प मन्नोळी तर आदर्श विद्यार्थिनी म्हणून अदिती रावण यांचा युकेजी वर्गातून आदर्श विद्यार्थी म्हणून आलोक पवार व आदर्श विद्यार्थिनी म्हणून प्रियाजनी सटाले यांचा सत्कार झाला.
कार्यक्रमात शाळेच्या प्लेग्रुप नर्सरी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी प्रबोधनात्मक वेगवेगळ्या नृत्य अविष्कारांनी मनोरंजन केले. कार्यक्रमास प्राचार्या स्नेहा घाटगे यांच्यासह शिक्षक शिक्षकोत्तर कर्मचारी, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta