
निपाणी (वार्ता) : येथील अकोळ रोड हुडको कॉलनी येथील श्री विरभद्रेश्वर मंदिर येथे विरभद्रश्वर यात्रा, सामुहिक गुग्गुळोत्सव कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मंगळवारी (ता.१९)
श्री भद्रकाली मूर्ती प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.
यावेळी जगद्गुरू शिवलिंगेश्वर महास्वामी, निडसोशी मठ, प्राणलिंग स्वामी, मल्लिकार्जुन स्वामी यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम होत आहेत. मंगळवारी (ता. १९) सकाळी श्री भद्रकाली मूर्तीची अक्कोळ रोड येथून भाविकांच्या उपस्थितीत सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर मंदिर ठिकाणी संकल्प पूजा, श्री मुर्ति जलाधिवास कार्यक्रम पार पडला. सायंकाळी श्रीवीरभद्रेश्वर भजनी मंडळ यांनी भजनसेवा केली. बुधवारी (ता.२०) सकाळी पुण्याहवाचन श्री गणहोम, नवग्रह- शांती, श्रीमुर्ति धान्यवास कार्यक्रम तर सायंकाळी भजन सेवा झाली. गुरुवारी (ता. २१) सकाळी लोक कल्याणासाठी महासंकल्प, रूद्र होम, पुर्णाहुती, श्री भद्रकाली व श्री विरभद्र मुर्ति अभिषेक, श्री भद्रकाली मुर्ती प्राणप्रतिष्ठापना व कळसारोहण कार्यक्रम होणार आहे .सायंकाळी ५ वाजता सामुहिक ललित सहस्त्रनाम स्त्रोत्र पठण होणार आहे.
मंगळवारी (ता. २६) लघुरूद्राभिषेक, श्रीं ची पालखी मिरवणूक, सामुहिक गुग्गुळोत्सव होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व कार्यक्रमांचे पौरोहित्य चिदानंद शास्त्री- हिरेमठ व सहकारी करणार आहेत. भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री विरभ्रदेश्वर देवस्थान कमिटीतर्फे करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta