निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील अरिहंत क्रेडिट सहकारी संघाच्या कुन्नूर शाखेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. महेंद्र जाधव यांनी स्वागत केले. सहकार रत्न उत्तम पाटील यांच्या उपस्थितीत दत्त कारखान्याचे संचालक शरदचंद्र पाठक यांच्या हस्ते लक्ष्मी व सरस्वती प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
उत्तम पाटील यांना कर्नाटक सरकारकडून सहकारत्न पुरस्कार मिळाल्याने सत्कार त्यांचा करण्यात आला. उत्तम पाटील म्हणाले, संघाकडून गेल्या अनेक वर्षांपासून सभासदांचे हित जोपासण्याचे कार्य केले आहे. सहकार क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रालाही प्राधान्य देत संस्थेने नावलौकिक मिळविला असल्याचे सांगितले.
कुन्नूर दूधगंगा प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाच्या निवडणुकीत विजय झालेल्या उत्तम पाटील गटाच्या संचालकांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी रावसाहेब गळतगे, मीनाक्षी तावदारे, शंकर ढंग, ग्रामपंचायत अध्यक्ष लक्ष्मण कांबळे, शिवाजी निकम, चैतन्य चेंडके, मानाजी चेंडके, विलास पाटील, माणिक कांबळे, विजय हेगडे, संतोष कोळी, रवी मगदूम, अजित जाधव, राजू कोळी उपस्थित होते. शाखाधिकारी तीर्थराज पाटील यांनी आभार मानले.