
निपाणी (वार्ता) : गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय राहून पुरोगामी विचारांचा प्रचार, प्रसार करणारे येथील सामाजिक कार्यकर्ते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल फौंडेशनचे चेअरमन हिटलर विष्णू माळगे यांना लोकराजा शाहू राज्यस्तरीय मानाचा आदर्श समाजभूषण पुरस्कार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते इचलकरंजी येथे शाहू महोत्सवात प्रदान करण्यात आला.
इचलकरंजी येथील लोकराजा शाहू महाराज चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने सामाजिक क्षेत्रात, पुरोगामी चळवळी जपण्यासाठी विशेष कामगिरी बजावणाऱ्या मान्यवरांच्या गौरवार्थ पुरस्कार देवून त्यांच्या कामाला बळ देण्याचे काम केले जाते. त्याच अनुषंगाने निपाणी परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून दीन-दलीतांसाठी काम करणाऱ्या हिटलर माळगे यांच्या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला होता. त्यानुसार इचलकरंजी येथे पार पडलेल्या शाहू महोत्सव कार्यक्रमात माळगे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमास रंजना कांबळे, अक्षरा कांबळे, विकास चौगुले, अन्नपुर्णा थरकार, संदीप भातमारे, मंथन कोठावळे, धनश्री कांबळे, संगीता कांबळे, अभिजीत जांभळेकर, प्रज्ञा कांबळे, ओंकार कांबळे, मिलींद घाटगे, अजित कांबळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta