
कुर्ली हालसिद्धनाथ मंदिरात बैठक; वेदगंगा पूरग्रस्त शेतकऱ्यांची उपस्थिती
निपाणी (वार्ता) : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या सहा पदरीकरणाच्या कामात यमगरणी येथील वेदगंगा नदीवर उड्डाणपूल उभारला जात आहे. यावेळी पुलाच्या बाजूने खडक आणि भराव घातला जात आहे. त्यामुळे नदी परिसरातील यमगरणी, कुर्ली, सौंदलगा, बुदिहाळ आणि परिसरातील शेतकऱ्यासह ग्रामस्थांना बॅक वॉटरचा धोका आहे. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी शेतकऱ्यांनी बैठक घेऊन मांगुर फाटा उड्डाणपूल परिसरातील भराव हठविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्ग विस्तारीकरण कामामध्ये मांगुर फाटा येथे भरावाची भित उभा करून महमार्ग प्राधिकरणाने सौंदलगा, यमगरणी, कुर्ली, भाटनांगनुर, कोडणी, महाराष्ट्रातील चिखली, म्हाकावे, कौलगे, बस्तावडे, आनुर, बानगे सुरुपली, सोनगे, कुरुकली, मळगे, यमगे कुरणी इत्यादी गावांना पुराचा धोका वाढणार आहे. यासाठी सदर भरावचे काम थांबवून सदर काम पिलरमध्ये पूर्ण व्हावे, यासाठी आंदोलन करण्याचा निर्धार करण्यात आला. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचे ठरले. गरज पडल्यास काम बंद आंदोलन करण्याचा एक मुखखी ठराव करण्यात आला.
मागील महिन्यात याबाबत निवेदन देऊनही कामात कोणताच बदल झालेला नाही. याचा आढावा घेण्यात आला.
के. डी. पाटील, अमर शिंत्रे, नानासो पाटील, शिवाजी पाटील, कुमार माळी, अजित पाटील यांनी, वेदगंगा नदी काठावरील सर्व ग्रामपंचायत मार्फत ठराव देण्याच्या मार्ग संमत झाला आहे. कर्नाटक व महाराष्ट्र भागातील बरीच गावे अंदाजे वीस पंचवीस फूट पुराच्या पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेथील सर्व ग्रामपंचायतीचा यासाठी ठराव मिळणार असल्याचे सांगितले.
यावेळी सीताराम चौगुले, शिवाजी चौगुले, आनंदा बेळवळे, लक्ष्मण नेजे, अभी निकाडे, विक्रम पाटील, युवराज पाटील, संतोष निढोरे, शिवाजी पाटील, दीपक पाटील, विशाल लोहार, प्रकाश लोहार, संदीप पाटील, बाळासाहेब कांबळे, धोंडीराम कांबळे, सुभाष पिष्टे, आप्पासो पिष्टे, अमोल पाटील, दादासाहेब पाटील, रोहित पाटील, यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि पूरग्रस्त, शेतकरी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta