निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता.कागल)येथील मोहनलाल दोशी विद्यालयामध्ये स्व. पद्मभूषण देवचंदजी शाह यांच्या स्मरणार्थ आंतरशालेय चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जनता शिक्षण मंडळाचे संचालक प्रकाश शाह उपस्थित होते.
मुख्याध्यापिका एस. एम. गोडबोले यांनी ‘कलेमध्ये माणसाचे मन वेडावून टाकण्याचे सामर्थ्य असते. कला ही माणसाच्या श्रमाचा परिहार करत असल्याचे सांगितले.
चित्रकला स्पर्धेत इयत्ता पहिली दुसरीच्या गटात – प्रथम, द्वितीय, तृतीय उत्तेजनार्थ अनुक्रमे प्रांजल आदित्य श्रीपणावर संस्कृती संदीप साळवी दर्शना दिनेश पाटील स्वरांजली विशाल लाटवडे
इयत्ता तिसरी चौथी गटात-
कु. श्रीनय सोमशेखर वाडकर (प्रथम), रुही धोंडीराम बोधले (द्वितीय), कु. श्रुती अमर शिंदे (तृतीय) दिव्या निलेश मुरगुडे उत्तेजनार्थ.
पाचवी ते सातवी च्या गटात कु. सोहम सिद्धाजी कांबळे (प्रथम),
राजवीर प्रशांत चंदनशिवे (द्वितीय), कु. नवोदय कृष्णात पाटील(तृतीय), कबीर विशाल लाटवडे उत्तेजनार्थ
तर आठवी ते दहावी गटात समी नौशादअली मुल्ला (प्रथम), कु. अदिती सिद्धाजी कांबळे (द्वितीय), कु. संस्कृती जयवंत दावणे(तृतीय) गुणेश राजेंद्र पोडजाळे उत्तेजनार्थ आदी विद्यार्थ्यानी यश पटकावले.
परीक्षक म्हणून निपाणीतील कलाशिक्षक सुनील पुंडे व एस. बी. मुल्लानी यांनी काम पाहिले. व्यासपीठावर मराठी कॉन्व्हेंटचे मुख्याध्यापक एस. के. कांबळे, किरणभाई शाह विद्यानिकेतन मुख्याध्यापक एस. टी. यादव आर. एस. भोसले, शिक्षक प्रतिनिधी आर. आर. कपले उपस्थित होते. एस. के. बुच्चे यांनी सूत्रसंचालन केले. एस. एच. श्रीखंडे यांनी आभार मानले.