निपाणी (वार्ता) : येथील रोटरी क्लब, बेळगाव रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम आणि अमेरिकेतील बर्मींग होमच्या संयुक्त विद्यमाने येथील रोटरी क्लबमध्ये मोफत श्रवण यंत्राचे वितरण करण्यात आले.
रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रवीण उर्फ विरू तारळे यांनी स्वागत केले. निपाणी परिसरात प्रथमच या श्रवण यंत्राचे वितरण करण्यात आले. यावेळी वैद्यकीय तपासणीनंतर सुमारे ८४ रुग्णांना २२ हजार ते ७ लाख २० हजार रुपये किमतीची श्रवण यंत्रे देण्यात आली. कागवाड येथील श्रीनिधी सुरज खोबरे या बाल रुग्णाला ७ लाख रुपये किमतीचे श्रवण यंत्र देण्यात आले.
यावेळी रोटरी क्लबचे सेक्रेटरी राजेश तिळवे, इव्हेंटचे अधिकारी सतीश श्रीपणावर, डॉ. अरविंद खडबडी, सुरज पवार, महावीर गिड्डोळी, किशोर जगदाळे, डॉ. सुरज जोशी, दिलीप पठाडे, वर्षा नंदर्गी, महांतेश हिरेकोडी, सुबोध शाह, सुजय शाह, संजय नंदर्गी, गणेश पट्टनशेट्टी, सोमनाथ परमणे, वृषाली तारळे, मुकुंद कुलकर्णी, शेखर बोरगावे, संजय पाटील यांच्यासह रोटरी क्लबचे सदस्य उपस्थित होते.