वैष्णवी चौगुले; कुर्ली हायस्कूलमध्ये जनजागृती
निपाणी (वार्ता) : मानवाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाने नवनवीन साधने वापरात आणली. पण त्याचा परिणाम चोरी आधुनिक पद्धतीने होवू लागली. सध्या चोरी, लुटमारी, फसवणुकीचे तंत्र बदलले आहे. त्यामुळे सर्व देशात वाढलेल्या सायबर गुन्हेगारीचे आव्हान चिंतेचे ठरत आहे. यासाठी सायबर गुन्हेगारी बाबत जागृती असणे महत्वाचे असल्याचे मत अर्जुननगर (ता.कागल) येथील देवचंद महाविद्यालयातील वैष्णवी चौगुले यांनी व्यक्त केले. त्या कुर्ली येथिल सिद्धेश्वर विद्यालयात आयोजित सायबर क्राईम जागृती कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस. एस. चौगुले होते.
ए. ए. चौगुले यांनी स्वागत केले.
वैष्णवी चौगुले यांनी सध्या ऑनलाईन फसवणूक, हॅकिंग कसे केले जाते याबाबत सविस्तर माहिती दिली.
एस. एस. चौगुले यांनी, घरात अथवा दुकानात शिरून किंवा खिशात हात घालून चोरी करण्याचा काळ आता राहिला नाही. चोऱ्या करण्याचे आधुनिक तंत्र वापरून ऑनलाइन पध्दतीने चोऱ्या केल्या जात आहेत. यासाठी बक्षिसाच्या किंवा संदेशाला भुलुन सायबर क्राइमचे बळी पडणार नाही, याची दक्षता प्रत्येकाने घेणे गरजेचे असल्याचे सांगितले.
यावेळी अथर्व माने, आदित्य साळुंखे, अलोक कांबळे, दिगंबर कुंभार, एस. एस. साळवी, के. ए. नाईक, ए. व्ही. पाटील, एम. एस. वाळके, एम. बी. खिरुगडे, व्ही. टी. साळुंखे, सागर कुंभार यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. टी. एम. यादव यांनी आभार मानले.