
पालकमंत्री सतीश जारकीहोळी; प्रशासकीय अधिकाऱ्यांशी विविध विषयावर चर्चा
निपाणी (वार्ता) : जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी अचानकपणे निपाणीस भेट देऊन प्रशासकीय अधिकारी, नेते कार्यकर्त्यांशी चर्चा केली केली. निपाणी तालुक्याच्या विकासासाठी माजी आमदार काकासाहेब पाटील यांच्या सहकार्याने सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत. शहरवासीयांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी नवीन प्रस्तावित तलाव कामासाठी आपण प्रयत्नशील असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
शनिवारी (ता.६) सकाळी १० वाजता येथील शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे माजी आमदार काकासाहेब पाटील, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी स्वागत केले.
त्यानंतर जारकीहोळी यांनी तहसीलदार एम. बी. बळीगार, पालिका आयुक्त जगदीश हुलगेज्जी, मंडल पोलीस निरीक्षक बी. एस. तळवार, क्षेत्र शिक्षणाधिकारी महादेवी नाईक यांच्यासह विविध अधिकाऱ्यांकडून प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेतला. त्यानंतर नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासकीय कामांत कोणताही हलगर्जीपणा खपवून घेणार नसल्याचा इशारा दिला.
माजी आमदार काकासाहेब पाटील, लक्ष्मणराव चिंगळे यांनी परिसरातील समस्यांसंदर्भात माहिती दिली. त्याला जारकीहोळी यांनी सकारात्मकता दर्शवली. माजी आमदार काकासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली विलास गाडीवड्डर यांच्या विनंतीवरून जारकीहोळी यांनी म्युनिसिपल हायस्कूल शाळेस भेट दिली. शाळेला आवश्यक सर्व सुविधांची प्रशासनाच्या वतीने पूर्तता करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. निपाणीकरांच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी संकल्पित १७५ कोटींच्या प्रस्तावित तलावाच्या जागेची पाहणी करण्यात आली. सदर प्रकल्प भागातील लोकांना लाभदायक असून त्यास चालना मिळावी, यासाठी आपण कार्यरत राहणार असल्याची माहिती जारकीहोळी यांनी दिली.
यावेळी विलास गाडीवड्डर, बसवराज पाटील, सुजय पाटील, निकू पाटील, शौकत मणेर, दत्ता नाईक, डॉ. जसराज गिरे, शेरु बडेघर, अनिता पठाडे, अनवर बागवान, फारुक गवंडी, मुन्ना पटेल, बाबुराव खोत, के. एम. वठारे, अरुण आवळेकर, संदीप चावरेकर, विजय ऱ्हाटवळ, धीरज वाडकर, प्रशांत हांडोरे, संदीप इंगवले, नवनाथ चव्हाण, यासीन मणेर, दिलीप पठाडे, दीपक सावंत यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta