निपाणी (वार्ता) : मत्तीवडे येथे मराठी शाळेजवळ उज्वला गॅस सिलेंडरचे वितरण कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
संघटनेचे तालुका अध्यक्ष बंटी पाटील यांनी स्वागत केले. यावेळी राजू पोवार यांनी, नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. यावेळी २१ लाभार्थींना गॅस सिलेंडरचे वितरण झाले. कार्यक्रमास तालुका युवा अध्यक्ष नितीन कानडे, लोका कार्याध्यक्ष मधुकर पाटील, बाबासाहेब पाटील, तानाजी पाटील, राजेश पाटील, चिनू कुळवमोडे, परशुराम कदम, सतीश पाटील, चेतन चव्हाण, राहुल खाडे, कुशाप्पा कांबळे, अंजना डोंगळे, सविता डोंगळे, लता माने, सुवर्णा कुळवमोडे, लक्ष्मीबाई चिखले,
ज्योती यादव, राधिका चव्हाण, मालाबाई केसरकर, शिवानी खाडे, श्रीमंती पाटील, कल्पना बेडगे, सुनीता काळे यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते.