
निपाणी (वार्ता) : येथील ईस्लाह ऊर्दू कॉन्व्हेंट स्कूल येथे विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले. इस्लामपूर येथील सामाजिक कार्यकर्ते व सबा फौंडेशनचे अध्यक्ष आबिद मोमीन यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष बशीरअहमद नदाफ होते.
मुबारक सौदागर यांनी स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम, विविध पारंपारिक वेशभुषा सादर केल्या. मान्यवरांच्या हस्ते वार्षिक क्रिडा स्पर्धेतील विजयी विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली.
आबिद मोमीन यांनी, या ऊर्दू हायस्कूलने सलोख्याची सांस्कृतिक परंपरा जपत शैक्षणिक प्रगती साधल्याचे सांगितले.
यावेळी डॉ. फजल पीरजादे, डॉ. अझरूद्दीन सोलापूरे, फिरोज मणेर, के. एम. वठारे, नजीर नालबंद, आय. एन. झारी, संस्थेचे उपाध्यक्ष खलिल अहमद मलिक, रमिज मुल्ला, हुमायून नालबंद, अश्फाक मणेर, जुबेर बागवान, मन्सूर मुल्ला, मूसा चाँदखान, आबिद मणेर, सफिना मुगळे, हिना जमादार, निलोफर दरवेष, तबस्सुम मुल्ला, रुक्साना बागवान यांच्यासह पालक विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
प्राचार्या तरन्नुम नदाफ यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta