ग्रामीण भागातील पाच जण पॉझिटिव्ह
निपाणी (वार्ता) : सर्वत्र थैमान माजवलेल्या कोरोना महामारीची तिसरी लाट निपाणीत दस्तक न देता सरळ दहशत निर्माण करणारी ठरली आहे. गुरुवारी (ता.13) निपाणीतील एका प्रतिष्ठित महाविद्यालयाध्ये एकाच वेळी 18 विद्यार्थी कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. तर या व्यतिरिक्त उपनगर आणि ग्रामीण भागातील पाच जण पॉझिटिव्ह वाढवले आहेत. त्यामुळे प्रशासनाची तारांबळ उडालेली आहे.
बेळगाव जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरूच असून आता निपाणीतील 18 विद्यार्थ्यांना त्याची लागण झाल्याचे शासकीय रुग्णालयातील अहवालात समोर आले आहे. बेळगाव जिल्ह्यातील निपाणी येथील महाविद्यालयामधील 18 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे त्यांच्या चाचणीत स्पष्ट झाले आहे. याची माहिती मिळताच निपाणी तहसीलदार डॉ. मोहन भस्मे यांनी महाविद्यालयाला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांनी महाविद्यालय बंद ठेवण्याचा आदेश बजावला आहे. त्यामुळे दुपारनंतर महाविद्यालयाला सुट्टी देण्यात आली आहे. तसेच महाविद्यालय चालू करण्या अगोदर संपूर्ण परिसराचे निर्जंतुकीकरण करून झाल्यानंतरच महाविद्यालय परत चालू करण्याचे आदेश दिले आहेत.
निपाणी शहर आणि तालुक्याच्या ग्रामीण भागातील अनेक विध्यार्थी या कॉलेजमध्ये शिक्षण घेतात. आता या कॉलेजच्या 18 विध्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने विध्यार्थी, पालक आणि शिक्षकांतही खळबळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
निपाणीचे तहसिलदार डॉ. मोहन भस्मे यांच्या म्हणण्यानुसार जरी ते विद्यार्थी पॉझिटिव्ह सापडले असले तरी त्यांच्यातील लक्षणे सौम्य प्रमाणात दिसत आहेत. तरी देखील त्यांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून कोणतीही काळजी करण्याचे कारण नसल्याचे स्पष्ट केले आहे. याशिवाय निपाणी उपनगरातील न्यु हुडको कॉलनी, ग्रामीण भागातील बेनाडी, भिवशी, आडी, पांगिरे- चांदशिरदवाड, जत्राट परिसरात ही कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. रुग्णांची वाढती संख्या निपाणी तालुक्याच्या दृष्टीने चिंताजनक असली तरीही विना मास्क करणार्यांची व गर्दी करणार्यांची संख्या कमी झालेली नाही. त्यामुळे प्रशासनाने कठोर निर्बंध सुरू करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
बाजारात विना मास्क गर्दीचा उच्चांक
शहर उपनगर आणि ग्रामीण भागातील या दोन दिवसात कोरणा रुग्णांची संख्या 30 वर पोहोचले आहे मात्र गुरुवारी (ता.13) भरलेल्या आठवडी बाजारात व्यापार्यांसह ग्राहकही विना मास्क गर्दी करताना दिसत होते. त्यामुळे पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता निर्माण झाले आहे.
Check Also
केंद्राने सीमाप्रश्नी लक्ष घालण्याची विनंती करणारा ठराव संमत
Spread the love मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल निपाणीत आनंदोत्सव निपाणी : मराठी भाषेला …