Saturday , July 27 2024
Breaking News

काँग्रेसची अखेर मेकदाटू पदयात्रेतून माघार

Spread the love

न्यायालयाच्या निर्देशाचे पालन, कोविड संसर्गाचे कारण

बंगळूर (वार्ता) : जनतेच्या तिखट टीका आणि कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करत काँग्रेसने गुरुवारी मेकेदाटू पदयात्रा अखेर मागे घेती. बुधवारी संध्याकाळी पदयात्रेवर बंदी घालण्याचा आदेश राज्य सरकारने जारी केला होता.
बुधवारी संध्याकाळी विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार हे दोघेही बंगळुरला परतल्याने पदयात्रा मागे घेण्याचे संकेत मिळाले होते. बंगळुरमधील टिंडलू येथील रहिवासी ए. व्ही. नागेंद्र प्रसाद यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेनंतर त्यांनी उच्च न्यायालयाच्या निरीक्षणांवर चर्चा केली.
त्यांनी सकाळी रामनगर येथे काँग्रेस विधिमंडळ पक्ष आणि नेत्यांची बैठक घेतली आणि कोविड-19 प्रकरणे कमी झाल्यावर पदयात्रा काही काळ थांबवण्याचा निर्णय घेतला.
एआयसीसी सरचिटणीस आणि कर्नाटकचे प्रभारी रणदीप सिंग सुरजेवाला, जे व्हायरसने त्रस्त होम आयसोलेशनमध्ये आहेत, त्यांनी बैठक सुरू असताना सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार या दोघांशी फोनवर चर्चा केली आणि त्यांना योग्य निर्णय घेण्याचा सल्ला दिला, अशी सूत्रांनी माहिती दिली.
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे आणि पदयात्रेत भाग घेतलेले माजी केंद्रीय मंत्री एम. वीरप्पा मोईली यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांचीही चाचणी सकारात्मक झाली आहे.
कनकपुर तालुक्यातील कावेरी संगम येथे पदयात्रेला सुरुवात करणार्‍या काँग्रेसने मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी भाजप सरकारवर टीका करत सरकारने ठरवून दिलेल्या सर्व कोविड -19 प्रोटोकॉलचे उल्लंघन करत ती जिद्दीने सुरू ठेवली होती. रामनगरातील प्रशासनाने सहा नेत्यांविरुद्ध तीन एफआयआर दाखल केले होते.
जनहित याचिकांनंतर हायकोर्टाच्या हस्तक्षेपामुळे शेवटी पदयात्रा संपली, ज्याला सुपर स्प्रेडर म्हटले गेले. या पदयात्रेत सहभागी होण्यासाठी 25 हजाराहून अधिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी 25 टक्के बंगळुरचे होते. 19 जानेवारीला नॅशनल कॉलेजच्या मैदानावर पदयात्रेचा सांगता समारंभ होणार होता. या मेळाव्यात लोक मोठ्या संख्येने एकत्र येण्याची शक्यता होती.
काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार बुधवारी संध्याकाळी थकल्यामुळे बंगळुरला परतल्याने काँग्रेसनेही सुटकेचा नि:श्वास सोडला. रविवारी यात्रेतून माघारी गेलेल्या सिद्धरामय्या यांनी पाठदुखीची आणि शिवकुमार यांनी हातपाय सुजल्याची तक्रार केली.
उच्च न्यायालयाने आपले तोंडी निरीक्षण करून सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी पदयात्रा थांबविण्याच्या सूचना दिल्याने, हा निर्णय घेण्यात आला आहे. कर्नाटकच्या जनतेच्या व्यापक हितासाठी आम्ही पदयात्रा काढली होती. परंतु परिस्थितीने आम्हाला सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी ते थांबवायला भाग पाडले. जेव्हा कोविड-19 प्रकरणांमध्ये घट होऊन परिस्थिती सुधारेल तेव्हा आम्ही पदयात्रा पुन्हा सुरू करू, असे माजी मंत्री व काँग्रेसचे आमदार प्रियांक खर्गे म्हणाले.
आम्ही लोकांच्या हितासाठी पदयात्रा थांबवली आहे, कारण सत्ताधारी भाजपने कोविड-19 प्रकरणे विशेषत: बंगळुरमध्ये पसरल्यानंतर आमच्यावर दोषारोप केला असता. परंतु आम्ही मेकेदाटू सिंचन प्रकल्पाच्या अंमलबजावणीची मागणी करत तिसरी लाट ओसरल्यानंतर ती पुन्हा सुरू करू, असे विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या म्हणाले.
नेत्यांविरुद्ध चौथे एफआयआर
रामनगर ग्रामीण पोलिसांनी कोविड नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल डी. के. शिवकुमार, सिद्धरामय्या आणि खासदार डी. के. सुरेश यांच्यासह काँग्रेस पक्षाच्या 30 नेत्यांविरुद्ध आणखी एक एफआयआर दाखल केला आहे. रामनगर जिल्हा पोलिसात नेत्यांविरुद्ध दाखल करण्यात आलेला हा चौथा एफआयआर आहे. दरम्यान, पक्षाच्या कार्यकर्त्यांची वाहतूक करणारी वाहने मंड्या आणि म्हैसूर मार्गावरील अनेक चेक पोस्टवर थांबवण्यात आली होती, जेणेकरून त्यांना आज रामनगर शहरात पोहोचणार्‍या पदयात्रेत सहभागी होता येऊ नये. पाचव्या दिवशी पदयात्रा सुरू करण्यासाठी उभारण्यात आलेला स्टेज गुरुवारी पहाटे काढण्यात आला.
मुख्यमंत्र्यांचे आवाहन
दरम्यान, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी गुरुवारी काँग्रेस नेते सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांना मेकेदाटू प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेली पदयात्रा मागे घेण्याचे आवाहन केले. उच्च न्यायालय आणि पक्षाच्या आमदारांनी पदयात्रेत सहभागी होण्यासाठी वाहने आणि व्यक्तींच्या आंतरजिल्हा हालचालींवर तात्काळ बंदी घातल्याच्या एका दिवसानंतर मुख्यमंत्र्यांनी ही विनंती केली होती.

About Belgaum Varta

Check Also

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट

Spread the love  शिरूर दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाखाची मदत बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *