
निपाणी (वार्ता) : श्री रवळनाथ को-ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटीच्या निपाणी शाखेचे सल्लागार प्रा. डॉ. शिवाजीराव होडगे यांचा मॉरिशिअस येथे शोधप्रबंध सादर झाला आहे. त्यानिमित्त येथील शाखा अध्यक्ष व्ही. आर. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मुरगुड येथील सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात मराठीचे विभागप्रमुख म्हणून कार्यरत असणाऱ्या प्रा. डॉ. शिवाजीराव होडगे यांनी मॉरिशिअस विद्यापीठातर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय सेमिनारमध्ये ‘भारत आणि मॉरिशिअस यांच्यातील सांस्कृतिक सहसंबंध’ या विषयावर शोधप्रबंध सादर केला. दोन्ही राष्ट्रातील भाषा, संस्कृती, चालीरिती यातील साम्य आणि भिन्नता या विषयी विस्ताराने त्यांनी मांडणी केली आहे.
यावेळी प्रा. डॉ. शिवाजीराव होडगे यांनी सत्कारबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. शाखा सल्लागार प्रा. डॉ. प्रविणसिंह शिलेदार यांनी स्वागत केले. शाखा सल्लागार प्रशांत रामनकट्टी यांनी आभार मानले. कार्यक्रमास शाखा सल्लागार प्राचार्य डॉ. प्रकाश हेरेकर, प्राचार्य डॉ. एम. बी. कोथळे तसेच ऍड. महेश कदम, तनमन शर्मा, शाखाधिकारी उत्तम दळवी, यांच्यासह सभासद, कर्मचारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta