वीरकुमार पाटील : भव्य मिरवणूक
कोगनोळी : येथील श्री 1008 आदिनाथ जैन मंदिर येथे सोमवार तारीख 22 जानेवारी ते शुक्रवार तारीख 26 जानेवारी अखेर पंचकल्याण महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवाची तयारी जोरात सुरू असून गुरुवार तारीख 18 रोजी दुपारी 1 वाजता नांदणी येथील परमपूज्य 108 जिनसेन स्वामींचे आगमन कोगनोळी नगरीत होणार आहे. यावेळी महाराजांची गावातील प्रमुख मार्गावरून सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे यासाठी श्रावक-श्राविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. शांतीसागर तपोभूमी गुंफा येथे होणारा पंचकल्याण महोत्सव सर्व बहुजनांनी उत्साहात साजरा करावा असे आवाहन माजी मंत्री वीरकुमार पाटील यांनी केले.
कोगनोळी तालुका निपाणी येथे शांतीसागर भवन येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाचे चेअरमन अनिल चौगुले, के. डी. पाटील, माजी तालुका पंचायत सदस्य बाळासाहेब कागले, कुमार पाटील होते.
सैनिक शाळेचे सचिव कुमार पाटील यांनी स्वागत करून प्रास्ताविकात पंचकल्याण महोत्सवात होणाऱ्या विविध धार्मिक कार्यक्रमांची माहिती दिली.
यावेळी बाळासाहेब पाटील, संजय खोत, युवराज कोळी, रमेश शेट्टी, पुनम डांगरे, एल. डी. चौगुले, राजगोंडा चौगुले, धीरज मगदूम, किर्ती पाटील, सुनिल पाटील, रवि पाटील, रमेश पाटील, विरेद्र चौगुले, अप्पासाहेब पाटील, अभिजित माणगांवे, दादासाहेब माणगांवे, संजय डूम, दादासो मोनाप, तुकाराम पाटील यांच्यासह वीर सेवा दल, महावीर जयंती उत्सव मंडळ, पंचकल्याण महोत्सव समितीचे पदाधिकारी, बहुजन समाजातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.