Saturday , July 27 2024
Breaking News

सहकारी संघामुळेच शेतकर्‍यांचा विकास

Spread the love

लक्ष्मीसेन भट्टारक स्वामी : बोरगाव येथे जीनलक्ष्मी संस्थेचे उद्घाटन

निपाणी (वार्ता) : शासकीय स्तरावर शेतकर्‍यांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. पण अंमलबजावणी वेळेवर होत नाही. शेतकर्‍यांचे अडीअडचणी लक्षात घेऊन गरजवंतांना वेळेत पत मंजूर करून शेतकर्‍यांचा जीवन उंचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न ग्रामीण भागातील सहकारी संस्था व संघ करीत आहेत. गाव, समाज व शेतकर्‍यांचे ऋण फेडण्यासाठी युवकांनी एकत्रित येऊन श्री जीनलक्ष्मी संस्थेची स्थापना केली आहे. या संस्थेकडून भविष्यात सहकार क्षेत्राबरोबरच सामाजिक कार्यालाही प्राधान्य मिळून सहकार क्षेत्राला एक आदर्श संस्था व्हावी, अशी सदिच्छा शिवमोग्गा जिल्ह्यातील नरसिंह राजपुर जैन मठाचे लक्ष्मीसेन भट्टारक स्वामीजी यांनी व्यक्त केले. बोरगाव येथे श्री जीनलक्ष्मी सौहार्द सहकारी संस्थेचे उद्घाटन लक्ष्मीसेन स्वामी, डॉ. श्रद्धानंदस्वामी यांच्या सानिध्यात युवा नेते उत्तम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फीत कापून संस्थेचे उद्घाटन करण्यात आले तर प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात केली. युवा नेते उत्तम पाटील यांनी, आज अनेक सहकारी संस्था प्रकल्प होत आहेत. पण स्पर्धात्मक युगात संस्था चालवणे अत्यंत कठीण बनले आहे. संस्थेच्या ठेवींमध्ये विक्रमी वाढ होत आहे. पण कर्ज वाटप होत नसल्याने संस्था संचालकांना संस्था चालवणे सभासदांना लाभांश देणे हे अवघड बनले आहे. संस्था चालकांनी संस्थेमध्ये राजकारण न आणता राजकारण विरहित संस्था चालावावी तरच सहकार क्षेत्राला प्राधान्य मिळत असल्याचे सांगितले.
डॉ. श्रद्धानंद स्वामींनी, सहकारी संस्था ग्रामीण भागातील अर्थकारणाचे कणा आहेत. त्यामुळे या संस्था टिकणे गरजेचे आहे. ग्रामीण भागाचा आर्थिक विकास सहकारी संस्थांमुळेच होत असते, असे सांगितले.
माजी जि.प. सदस्य अण्णासाहेब हावले, जय किसान संस्थेचे अध्यक्ष सुनील पाटील, संस्थेचे मुख्य प्रवर्तक सागर मिरजे, चेअरमन अजित पाटील, डॉ. शंकर माळी, बी. जे. पाटील, टी. डी. सावाडे, राजू नरवाडे, महावीर मगदुम, नेमिनाथ बारवाडे, संचालक निलेश पाटील, प्रवीण हवले, श्रीमंधर पाटील, भरतेश लगारे, आनंद मोकाशी, रंजीत ऐतवाडे, पोपट चौगुले, प्रकाश फिरगन्नवर, सतीश मोरे, अश्विनी नरवाडे, श्रीदेवी तेरदाळे, अमर सातपुते, रविंद्र वसवाडे यांच्यासह सल्लागार मंडळ, नूतन सर्व नगरसेवक, कर्मचारी, सभासद, ग्रामस्थ उपस्थित होते.
अजित भुजगोंड पाटील यांनी स्वागत केले. सुधाकर इंडी सूत्रसंचालन केले. सेक्रेटरी ओंकार म्हैशाळे यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

शेतकरी वाहनांना टोल माफी मिळावी

Spread the love  रयत संघटनेची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन निपाणी (वार्ता) : बेळगाव जिल्ह्यातील अनेक शेतकरी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *