
लक्ष्मीकांत पाटील; कुर्ली हायस्कूल मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
निपाणी (वार्ता) : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दहावीनंतरचे शिक्षण घेण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यासाठी सामाजिक संस्थांनी सामाजिक भूमिकेतून उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलून जबादार पालकाची भूमिका पार पाडली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करून त्यांच्या उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे, असे मत कागल यश अकॅडमीचे प्रमुख लक्ष्मीकांत पाटील यांनी व्यक्त केले. ते कुर्ली येथील सिद्धेश्वर विद्यालयात आयोजित गुणवंत विद्यार्थी गौरव कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्याध्यापक एस. एस. चौगुले होते.
टी. एम. यादव यांनी स्वागत केले. प्रा. अक्षय पाटील व प्रा. अमर पाटील यांनी दहावी -बारावी परीक्षेची तयारी कशी करावी, याबाबत मार्गदर्शन केले. विद्यालयात दहावीच्या वर्गातील शुभांगी पाटील, तन्वी कमते, केदार मगदूम, श्रुती परमकर, अवंतिका घाटगे, निशिगंधा पाटील या गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देवून गौरविण्यात आले.
यावेळी एस. ए. पाटील, एस. एस. साळवी, के. ए. नाईक, ए. व्ही. पाटील, एम. एस. वाळके, एम. बी. खिरुगडे, व्ही. टी. साळुंखे, सागर कुंभार यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. ए. ए. चौगुले यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta