
निपाणी (वार्ता) : येथील शहराबाहेरील न्यू हुडको कॉलनीमधील श्री सिद्धिविनायक गणेश मंडळातर्फे हार्दिक कुंकू कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी नगरसेविका उपासना गारवे तर प्रमुख पाहुण्या म्हणून बोरगाव येथील विनय श्री अभिनंदन पाटील उपस्थित होत्या.
प्रारंभी सामाजिक कार्यकर्ते सचिन गारवे यांनी स्वागत केले. त्यानंतर व्यासपीठावरील मानेवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात यश मिळवलेल्या विद्यार्थिनींचा गौरव करण्यात आला. विनयश्री पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास बोरगावच्या अश्विनी, मगदूम आशाराणी पाटील, नगरसेविका अनिता पठाडे, दीपाली गिरी, श्रावणी श भिवशे, मंडळाचे अध्यक्ष काशिमखान पठाण, सुनील तावदारे, महेश तावदारे, उमेश माळगे, बलराज घस्ते, रवि समाजे, डॉ. नामदेव कऱ्यापगोळ, सर्जेराव जाधव यांच्यासह महिला व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta