
माजी आमदार काकासाहेब पाटील : हजरत राजेबागस्वार दर्गा विकास कामास प्रारंभ
निपाणी (वार्ता) : राज्य सरकारच्या वक्फ खात्याकडून जत्राट येथील श्रध्दास्थान हजरत राजेबागस्वार दर्गा विकासासाठी ११ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ५ लाख रुपये सुपूर्द करण्यात आले असून उर्वरित निधी लवकरच देण्यात येणार असल्याची माहिती माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी दिली. या कामाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
काकासाहेब पाटील म्हणाले, निवडणूक शेवटचीच असली तरी येणाऱ्यांना मार्ग सुकर होईल, असे काम करणार आहे. निधी मंत्री जमीर अहमद यांनी तात्काळ ५ लाखांचा निधी हस्तांतरित करुन उर्वरित निधी मार्च नंतर देण्याची ग्वाही दिली आहे. आगामी काळातही जोमाने कार्यरत राहणार असून भेदभाव न करता कामे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राणी कांबळे, राजू मकानदार यांनी, काकासाहेब पाटील यांनी कामे कधीच टाळली नाहीत. गावच्या विकासासाठी भरघोस निधी दिला. सामान्य कार्यकर्त्यांना पत मिळवून दिली. आगामी काळातही त्यांच्या माध्यमातून भरघोस निधी उपलब्ध होईल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी के. एम. वठारे, जरारखान पठाण, अस्लम शिकलगार यांनी मनोगत व्यक्त केले.
वक्फ बोर्डाकडून भिवशी येथील मुस्लिम समाजाला मिळालेल्या ६० हजार रुपयांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले.
बाबासाहेब कोकाटे यांनी स्वागत केले. मुस्लिम समाजावतीने प्रार्थना स्थळाच्या दुरुस्ती करावी, यासाठी निवेदन देण्यात आले.
यावेळी निपाणी भाग कॉंग्रेसचे अध्यक्ष राजेश कदम, अशोक पाटील, निकू पाटील, ग्रामपंचायत अध्यक्षा राणी कांबळे, उपाध्यक्ष विजय पोवार, रमेश भिवसे, नवनाथ चव्हाण, सागर पाटील, शिवाजी रानमाळे, रोहन भिवसे, संजय करनुरे, जालिंधर कोळी, शब्बीर मकानदार, श्रीनाथ कल्लोळे, गोपी जबडे, राजू मकानदार, बाबासाहेब कोकाटे, महादेव हवान, अवधूत गुरव, प्रशांत हांडोरे, प्रतिक शहा, अरुण आवळेकर, निलेश येरूडकर, जमीर मुल्ला, राजू मुल्ला, महंमद मुल्ला, रियाज मकानदार, समीर मुल्ला, हुसेन मुल्ला, सोहेल मुल्ला यांच्यासज्ह नागरिक उपस्थित होते. जमीर मुल्ला यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta