
निपाणी (वार्ता) : येथील दिवंगत शामराव मानवी यांनी स्थापन केलेल्या श्री लक्ष्मी वेंकटेश क्रेडिट संवर्धन संस्थेची निवडणूक बिनविरोध झाली. त्यानंतर अध्यक्षपदी धनंजय देशपांडे तर उपाध्यक्षपदी शरयू मानवी यांची निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून चिकोडी येथील लेखा परीक्षण विभागाचे उपनिर्देशक सतीश आप्पाजीगोळ होते.
यावेळी संचालकपदी अभय देशपांडे, शंतनू मानवी, आर. महेश शेनॉय, दत्तात्रय कुलकर्णी, राजाराम कुलकर्णी, उदय यरनाळकर, रामनारायण कुलकर्णी, महेश यारनाळकर, प्रसाद जोशी, शिरीष कुलकर्णी, रोहिणी कुलकर्णी, शिवानंद चौनाईक यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी धनंजय देशपांडे यांनी, सर्व संचालक व सभासदांनी आपल्याला बिनविरोध निवडून दिले आहे. त्यांच्या विश्वासाला पात्र राहून संस्थेच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील राहण्याची ग्वाही दिली. यावेळी संस्थेचे संचालक व कर्मचारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta