
निपाणी (वार्ता) : येथील खैर मोहम्मद पठाण हायस्कूल मधील मुख्याध्यापक झेड. के. पटेवेर हे निवृत्त झाले आहेत. त्यांच्या जागी शबाना सैफुद्दीन मुल्ला या नूतन मुख्याध्यापिका म्हणून रुजू झाल्या आहेत. त्यानिमित्त कर्नाटक राज्य माध्यमिक शाळा सहशिक्षक संघटनेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास चिक्कोडी विभागाचे सेक्रेटरी आदम पिरजादे राज्य संघटनेचे सदस्य आर. आर. जनवाडे, खजिनदार एम. ए. उस्ताद, जे. एस. वंटमुरे, एस. एस. मुल्ला, आर एल सरवड एन. एल. गणेशवाडी, अशीच गुलबर्गे एम. ए. खानापुरे, आर.ए. आरभावे, एस. एस. जनवाडे, एस. एस. मुल्ला यांच्यासह पदाधिकारी व शिक्षक संघटनेचे सदस्य उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta