
ग्रामीण भागातून ३२ संघांचा सहभाग
निपाणी (वार्ता) : कुर्ली क्रिकेट क्लबतर्फे कुर्ली हायस्कूलच्या मैदानावर खुल्या टेनिसबॉल फुल पिच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये रेंदाळ क्रिकेट क्लबने विजेतेपद पटकावले. या संघाला २५ हजार रुपये व चषक देवून गौरविण्यात आले. कुर्ली संघ उपविजेता ठरला.
अंतिम सामन्यात नाथ होलसेलचे मालक रवींद्र चौगुले यांच्या हस्ते नाणेफेक करण्यात आली. या सामन्यात रेंदाळ क्रिकेट क्लबने प्रथम फलंदाजी करीत कुर्ली क्रिकेट क्लब संघाला ८ षटकात १०९ धावांचे लक्ष दिले. प्रत्युत्तरादाखल खेळतांना कुर्ली संघाने ८८ धावा जमविल्या. तिसरा क्रमांक बोरगाव स्पोर्ट्स क्लब तर चतुर्थ क्रमांक कोगनोळी स्पोर्टस क्लबने पटकाविला. अंतिम सामन्यात अष्टपैलू खेळ करणाऱ्या रेंदाळच्या नागेश पाटील याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. उत्कृष्ट फलंदाज दिग्विजय पाटील, उत्कृष्ट गोलंदाज पंकज सुतार व मॅन ऑफ द सिरीज आदर्श पाटील यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
माजी सैनिक वसंत पाटील, डॉ. सुरज आरगे, एस. एस. चौगुले, रॉकी हेरवाडे, शुभम पाटील, अरुण डोंगरे, कृष्णात मगदूम, सागर कमते, विजय पाटील, श्रीराज पाटील, राजू पाटील, अक्षय पाटील शिंगाडी दिवटे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
कार्यक्रमास कुर्ली क्रिकेट क्लबचे अध्यक्ष यशवंत ढगे, नवनाथ पाटील, सुरेश ढगे, नामदेव साळवी, पी. एस. यादव, सागर जाधव, अभिजित माळी, संग्राम जाधव, संदेश देसाई, संदीप हेरवाडे, शरद चौगुले, सूरज शेंदरे, शैलेश बोंगार्डे, सुमित घराळे उपस्थित होते.
चिमगाव येथील नृत्य पंच महेशबुवा व सचिन वडगावे यांनी पंच म्हणून काम पाहिले. संग्राम जाधव यांनी सूत्रसंचालन केले.
Belgaum Varta Belgaum Varta