
निपाणी (वार्ता) : येथील बसस्थानकात निपाणीहून इचलकरंजीला जाणाऱ्या बसमध्ये चढताना अज्ञात चोरट्यांनी महिलेच्या बॅगेतील दीड तोळे सोन्याचे दागिने व रोख दहा हजार रुपये ठेवलेली पर्स लंपास केली. मिलाग्रीन मदर (रा. इचलकरंजी) असे चोरी झालेल्या महिलेचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, मिलाग्रिन मदर यांचे माहेर – हल्ल्याळ (ता.दांडेली) आहे. त्यावार्षिक उत्सवासाठी गेल्या होत्या. निपाणीत येऊन निपाणी-इचलकरंजी बसने – इचलकरंजीकडे जात असताना बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या बॅगेतील पर्स चोरी केली. या पर्समधील दीड – तोळ्याचे दागिने व रोख दहा हजार रुपये रक्कम लंपास केली. बसमध्ये चढल्यानंतर मिलाग्रीन यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी खाली येऊन सदर घटनेची माहिती बसचालक व वाहकांना दिली. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत पोलिसात तक्रार देण्याचे काम सुरू होते.
——————————————————————-
दक्ष राहण्याचे आवाहन
कर्नाटक शासनाने महिलांसाठी शक्ती योजना सुरू केल्याने मोफत प्रवास आहे. त्यामुळे महिलांची गर्दी वाढत आहे. या गर्दीचा फायदा अज्ञात चोरटे घेत आहेत. पोलिस गर्दी असणाऱ्या ठिकाणी लक्ष देत असले तरी चोरीचे प्रकार होत आहेत. त्यामुळे महिला वर्गांनी दक्ष राहण्याबरोबर आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घेण्याचे आवाहन आगारप्रमुख संगाप्पा यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta