Monday , December 8 2025
Breaking News

निपाणीत अश्वारूढ शिव पुतळ्याचे स्वागत

Spread the love

 

मान्यवरांची उपस्थिती : शासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती

निपाणी (वार्ता) : सदलगा येथे प्रतिष्ठापना करण्यात येणाऱ्या भव्य अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे निपाणीत समस्त शिवप्रेमी नागरीकांच्यावतीने शहरात भव्य स्वागत करण्यात आले. बॅ.नाथ पै चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीचे आगमन होताच मान्यवरंच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून स्वागत करण्यात आले. कोल्हापूर मधील मूर्तीकार संदिप पाटील यांनी तयार केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा मिरवणुकीने
कोगनोळीमार्गे निपाणीत दाखल झाला. निपाणीत शिवरांची मुर्ती बेळगांव नाका येथे दाखल झाल्यानंतर प्रारंभी माजी आमदार काकासाहेब पाटील, तहसिलदार मुजफ्फर बळीगार, पालिका आयुक्त जगदीश हलगेज्जी, मंडल पोलीस निरीक्षक बी. एस. तळवार, माजी नगराध्यक्ष प्रविण सडोलकर-भाटले, युवा उद्योजक रोहण साळवे, राजेश कदम, पंकज पाटील, सुजय पाटील यांच्या हस्ते पुजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी माजी आमदार प्रा. सुभाष जोशी, सहकारत्न उत्तम पाटील, अशोककुमार असोदे, हालशुगरचे संचालक जयवंत भाटले, राजु गुदेशा व सहकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. स्वागत होताच मिरवणूकीला प्रारंभ करण्यात आला. यावेळी फटाक्याची आतषबाजी, मुलींचे लेझीम पथक, नाचणारे घोडे, हलगी, करडी ढोल व डॉल्बीसह भव्य मिरवणूक काढण्यात आली. बेळगांव नाका जोशी गल्ली, छत्रपती शिवाजी महाराज चौक, चाटे मार्केट, नगरपालिका, मंगळवार पेठ कॉर्नर, साखरवाडी, छत्रपती संभाजी महाराज चौक, चिकोडी रोड मार्गे महात्मा बसवेश्वर चौक पर्यंत मिरवणूक काढण्यात आली. नगरपालिका ते बसस्थानकापर्यतच्या मार्गावर शिवभक्तांकडून भव्य रांगोळी काढून, पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आली. नगरपालिकेतर्फे मिरवणुकीच्या मार्गावर स्वच्छता करून पाणी मारून रस्ता स्वच्छ करण्यात आला होता. मिरवणूक मार्गावर शिवभक्ताकडून पाणी, दूध तर मुस्लीम बांधवाकडून सरबतची सोय करण्यात आली होती.
मिरवणूकीत राजकुमार सावंत, माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वड्डर, अन्वर बागवान, नगरसेवक रवींद्र शिंदे, गणी पटेल, नवनाथ चव्हाण, निकु पाटील, गोपाळ नाईक, श्रीमंत दादाराजे दादाराजे देसाई-सरकार, रत्नशास्त्री ए. एच. मोतीवाला, माजी नगराध्यक्ष विजय शेटके, अस्लम शिकलगार, माजी उपनराध्यक्ष झाकीर कदरी, नगरसेवक विनायक वडे, शौकत मणेर, दत्ता नाईक, शांती सावंत, अनिता पठाडे, दिपाली गिरी, उपासना गारवे, चेतन स्वामी, जरारखान पठाण, किरण कोकरे, प्रणव मानवी अमित रणादिवे, दत्ता जोत्रे यांच्यासह शिवप्रेमी उपस्थित होते. शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षिका उमादेवी, शिवराज नायकवडी व पोलीस प्रशासनाने यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता.

About Belgaum Varta

Check Also

इचलकरंजी येथील युवकाचा निपाणी जवळ खून

Spread the love  धारदार शस्त्राचा वापर ; मृतदेह टाकला ओढ्यात निपाणी (वार्ता) : इचलकरंजी येथील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *