निपाणी (वार्ता) : श्री. विठू माऊली पायी माघवारी दिंडी श्रीक्षेत्र पंढरपूरकडे श्रीमंत दादाराजे देसाई निपाणकर- सरकार यांच्या प्रमुख उपस्थितीत रवाना झाली. राजेंद्र मोहिते यांनी स्वागत केले.
श्रीमंत दादाराजे सरकार यांच्या हस्ते पालखीमधील श्री. विठ्ठल रुक्मिणी यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. तुळशी वृंदावन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दिंडी सोहळ्याचे प्रस्थान झाले. मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर रिंगण सोहळा झाला.
निपाणीतील प्रमुख मार्गासह शिवाजी चौक, चाटे मार्केट, नेहरू चौक, महादेव गल्ली, कॉर्नर, जत्राट वेसमार्गे ममदापूरकडे दिंडीचे प्रस्थान झाले.
कार्यक्रमास आनंद मोरे, उमेश सुपले, प्रमोद वडगे, विकास माने, श्रीकांत शेवाळे, संजय पाटील, ललिता मोहिते, नर्मदा मोहिते, वैशाली पोटले, वर्षाराणी दिवटे, राधाबाई बागे, सुशीला शिंदे, शिवाजी खामकर, बाळकृष्ण खराडे, सुरज पारळे, डॉ. संदीप चिखले यांच्यासह नागरिक उपस्थित होते.