निपाणी (वार्ता) : येथील मराठा मंडळ संचलित बालवाडी, मराठी विद्यानिकेतन आणि मराठा मंडळ हायस्कूलमध्ये ‘गुंजन’ २०२४ वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी (ता.१२) खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे पदार्थ बनवले होते.
प्रारंभी माजी जिल्हा पंचायत सदस्या अमृता पाटील, सुमित्रा उगळे, बेडकिहाळ येथील राजमाता जिजाऊ महिला सहकारी बँकेच्या अध्यक्षा सुप्रिया पाटील, माजी नगराध्यक्षा शुभांगी जोशी व मान्यवरांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले.
सुमित्रा उगळे यांनी, विद्यार्थ्यांना लहान वयातच व्यवसायिक शिक्षण देण्याचा उपक्रम स्तुत्य आहे.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनात चांगला उपयोग होणार आहे. विद्यार्थ्यांनी ‘फास्ट फूड’ ऐवजी घरात बनवलेले पदार्थ खाऊन आरोग्य निरोगी ठेवण्याचे आवाहन केले. शुभांगी जोशी यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास राजेश कदम, रवींद्र कदम, संगीता कदम, ज्योती कदम,मुख्याध्यापक दादासाहेब हळवणकर, मानसी पवार, चिक्कोडीकर बाळासाहेब मोहिते, संजय साखळकर, जयश्री ढंगे, अथर्व पाटील, अमृता माने, उत्कर्ष रणदिवे, श्वेता देशमुख यांच्यासह शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.