विद्या बडवे; निपाणीत महिलांसाठी व्याख्यान
निपाणी (वार्ता) : महिलांना जिवनात यशस्वी व्हायचे असेल तर केवळ एकाच पातळीवर भर न देता शारिरिक, मानसिक, बौध्दिक, सामाजिक व अध्यात्मिक पातळीवर प्रगती साधणे आवश्यक असल्याचे मत, कोल्हापूर येथील आदर्श शिक्षिका विद्या बडवे यांनी व्यक्त केले.
सोसायटी फॉर एज्युकेशन वेल्फेअर अँड ऍक्शन (सेवा) या एन.जी.ओ.च्या वतीने बसवाणनगर येथे बचत संघातील सभासदासाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी छाया शिंदे होत्या.
शितल मोरे यांनी स्वागत केले. संस्थेचे सचिव अशोक तोडकर यांनी सेवासहयोग महिला बचत संघ, परकर निर्मिती व विक्री केंद्राच्या कामाचा आढावा घेतला. बचत संघाने दोन वर्षामध्ये १.३५ लाखाची बचत केली असून गरजू महिलांना कर्ज उपलब्ध करुन दिल्याचे सांगितले. यावेळी १४ महिलांचा सत्कार करण्यात आला. बचत संघातील सभासदांना लाभांश वाटप करण्यात आले. कमल कोळी यांनी मानले.
कार्यक्रमास शालन तोडकर, सीमा कोठीवाले, संध्या शेट्टी, अनिता कांबळे, सखुताई शिंदे, सुनिता खडके, निलम लाड, स्नेहल चव्हाण, अश्विनी पारळे, अनिता सोकांडे, शेवंता देवडकर, विमल साळुंखे, रोहिणी मिरजे, कविता रणदिवे, दिया पिरुने, मधुरा म्हावरकर, पुनम बुरुड यांच्यासह महिला उपस्थित होत्या.