
निपाणी (वार्ता) : येथील बीएसएम जीआय बागेवाडी प्राथमिक शाळेत २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण कार्यक्रम पार पडला.
यावेळी रांगोळी, निबंध, गाणी, वेशभूषा, खाद्यपदार्थ तयार करून त्याची विक्री करणे, मेहंदी, पतंग, लगोरी, संगीत खुर्ची, भरतनाट्य, गणित जत्रा, विज्ञान साहित्य प्रदर्शन, क्ले मॉडेलिंगसह विविध स्पर्धा घेण्यात आल्या त्यातील विजेत्यांना प्रमाणपत्र व बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमास जी. आय. बागेवाडी पदवी पूर्व कॉलेजचे प्राचार्य डॉ. एन. एस. मादन्नावर, मुख्याध्यापक वाय. बी. हंडी, गर्ल्स हायस्कूलचे मुख्याध्यापक जी. एम. कमते, मराठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक डी. के. नाईक, अश्विनी बुलबुले, वैशाली शेटवू, हायस्कूलचे मुख्याध्यापक संजीव देसाई, एन. जी. मोकाशी, एम. के. मगदूम, जे. बी. जोशी, पूजा कोतमिरे, एस. एम. संकपाळ, कावेरी बडिगेर, प्रसाद हगलादिवटे यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta