निपाणी (वार्ता) : बेळगाव येथील मराठा मंडळ संचलित येथील मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन यश मिळवले आहे.
येथील साई संस्थेतर्फे आयोजित ग्रुप डान्स स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. त्यांना प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह आणि रोख ३ हजार रुपये बक्षीसे देण्यात आली. साई ग्रुप यांच्यातर्फे आयोजित खुल्या राज्यस्तरीय तायक्वांदो चॅम्पियनशिप २०२४ या स्पर्धेमध्ये विराज मोहिते यांने स्पीड पंच प्रकारात सुवर्णपदक, पुमसे प्रकारात सुवर्णपदक व फाइट स्पर्धेमध्ये रौप्यपदक मिळविले.
जोल्ले ग्रुप आंतरशालेय स्पर्धेमध्ये प्राप्ती पाटील हिने भरत नाट्यम स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. तिला स्मृतीचिन्ह व रोख ११ हजार रुपयेचे बक्षिस देण्यात आले. उच्च प्राथमिक गटामध्ये श्रावणी पाटील हिने सोलो डान्स स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकवला. तेजस्विनी घोरपडे हिने ‘ऍडमॅड’या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. संकल्प मनोळी यांने पिक अँड स्पीच स्पर्धेमध्ये प्रथम, वर्धन चौगुले यांने विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक मिळवला. निनाद कलागते यांने बँड ग्रुपने प्रथम क्रमांक, प्राप्ती पाटील हिने जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकवला.
यशस्वी विद्यार्थ्यांना मराठा मंडळाच्या अध्यक्षा राजश्री नागराजू, प्राचार्या स्नेहा घाटगे, अश्विनी हिरेकुडी, पूजा पाटील, प्रतिभा काळे, समीक्षा शिंदे, स्वाती पाटील, भारती नरेगल, अजित सुलतानावर यांचे मार्गदर्शन लाभले.