निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील महावीर सर्कल येथे काही महिन्यांपासून उभारण्यात येत असलेल्या कीर्तीस्तंभाचे लोकार्पण सोहळा पार पडला. संस्कार शिरोमणी आचार्य रत्न श्री १०८ कुलरत्नभूषण मुनी महाराज व १०८ श्री उत्तमसागर मुनी महाराज, यजमान धर्मानुरागी, सहकाररत्न उत्तम पाटील व माजी जिल्हा परिषद सदस्य अण्णासाहेब हावले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. त्यानिमित्त आदीसागर जैन गुंफा येथे सुमारे ११० मुलांचे मौजी बंधन करण्यात आले.
उत्तम पाटील म्हणाले, सन १९७४ साली बोरगाव चौकाची महावीर सर्कल म्हणून कर्नाटक विधानसभेत नोंद आहे. येथे कीर्तीस्तंभ होण्यासाठी कुलरत्नभूषण मुनी महाराजांनी परिश्रम घेतले. त्यासाठी जैन धर्मासह इतर धर्मीय नागरिकांनी सहकार्य केले.जैन धर्म हा आपण विश्वधर्म म्हणून समजतो. पण या ठिकाणी धर्म एकत्र आला पाहिजे. यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. राजकारण विरहित धार्मिक कार्य केल्यास ते नक्कीच यशस्वी होत असल्याचे त्यांनी सांगितले.
अण्णासाहेब हावले म्हणाले, जैन हा धर्म पवित्र आहे. धर्माचे आचार, विचार यामुळे सर्वांना पुण्य प्राप्त होते. बरकत चाललेल्या समाजाला एकत्र आणण्यासाठी सर्वांनी एकत्र असणे गरजेचे आहे.माता, भगिणींमुळे समाज टिकून आहे. पुढील काळात धार्मिक वातावरणात सर्व धर्मीय एकत्र येऊन कार्य करणे गरजेचे असल्याचे सांगितले.
गुरु संस्कार, धर्म शिबिर, भारतीय संस्कृती, सवशरण, समाज कार्य या विषयावर आचार्य श्री कुलरत्नभूषण मुनी महाराज उत्तमसागर मुनी महाराजांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास सुजाता लगारे, स्वरूपाताई पाटील यड्रावकर,भाऊसाहेब पाटील विद्याधर अम्मान्नावर, अभयकुमार करोले, अभयकुमार मगदूम, राजू मगदूम, डॉ. शंकर माळी, अण्णासो बारवाडे, राजेंद्र पाटील, सुनीता हवले, मनोजकुमार पाटील, बाबासो वठारे, बंडू चौगुले, अनुज हावले, संजय हावले, हिराचंद चव्हाण, प्रदीप माळी यांच्यासह दिगंबर जैन समाजाचे पदाधिकारी, श्रावक, सर्व धर्मीय नागरिक उपस्थित होते.