Wednesday , March 4 2026
Breaking News

मेंढपाळाच्या मुलाची सैन्य दलात भरारी

Spread the love

 

बेनाडीच्या मारुती हजारेचे यश‌ : दीडच वर्षात मिळवले यश

निपाणी (वार्ता) : गेल्या काही वर्षापासून सैन्य दलात भरती होण्यासाठी अनेक युवक सराव करीत आहेत. त्यामध्ये अनेक जण यशस्वी होत आहेत. बेनाडी येथील मेंढपाळ व्यवसायिक आप्पासाहेब हजारे यांचा मुलगा मारुती हजारे यांनी केवळ दीड वर्षाच्या सरावानंतर त्याची सैन्य दलात निवड झाली आहे. व्यवसायाने मेंढपाळ असूनही मारुतीने मिळवलेले यश कौतुकास्पद आहे.
मारुती हजारे यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण बेनाडी येथे झाले. त्यानंतर बारावीपर्यंतचे शिक्षण केएलई संस्थेच्या जी.आय. बागेवाडी महाविद्यालयात झाले. त्यानंतर डिप्लोमा करण्याचा प्रयत्न केला. पण पुढील शिक्षण घेता आली नाही. त्यामुळे खचून न जाता जिद्द, परिश्रम आणि चिकाटीने सैन्य दलात भरती होण्यासाठी दीड वर्षे प्रयत्न केले. अखेर त्याच्या प्रयत्नाला यश मिळाले असून त्याची सैन्य दलात निवड झाली आहे. लवकरच तो प्रशिक्षणासाठी रवाना होणार आहे. त्याच्या या यशासाठी निवृत्त बँक अधिकारी अण्णासाहेब हजारे आणि आई-वडिलांचे मार्गदर्शन मिळाले.
——————————————————————-
‘कोणतेही काम कठीण असले तरी कष्ट घेतल्याशिवाय यशा पर्यंत पोहोचू शकत नाही. त्यासाठी सध्याच्या युवकांनी ध्येय ठेवून आपला उद्योग व्यवसाय करतच सातत्याने सराव करणे आवश्यक आहे.’
– मारुती हजारे, बेनाडी

About Belgaum Varta

Check Also

निपाणी परिसरात होळीचा सण भक्तीभावाने

Spread the love  आता सर्वांनाच रंगपंचमी सणाची आतुरता निपाणी (वार्ता) : शहर, उपनगर आणि ग्रामीण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *