
निपाणी (वार्ता) : येथील मराठा मंडळ संचलित मराठा मंडळ हायस्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा झाला. अध्यक्षस्थानी संगीता रविंद्र कदम तर प्रमुख पाहुणे म्हणून म्हणून कुर्ली सिद्धेश्वर विद्यालयाचे निवृत्त मुख्याध्यापक बी. एस. पाटील होते.
के. एस. देसाई यांनी स्वागत केले. मुख्याध्यापक डी. डी. हळवणकर यांनी विद्यार्थ्यांना विज्ञानाचे महत्त्व सांगितले. त्यानंतर विज्ञानवादी जगण्यासाठी विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली.
बी. एस. पाटील यांनी, विद्यार्थ्यांनी चौकस पद्धतीने शिक्षण घेतले पाहिजे. सध्या विज्ञानवादी युग आहे. या संगणकाच्या युगात वावरताना प्रत्येक टप्प्यावर मिळणारे वैज्ञानिक ज्ञान जोपासले पाहिजे. आई-वडील, शिक्षकांचा आदर सन्मान करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमास व्ही. व्ही. पत्की मॅडम, ए. एम. यादव, किरण कांबळे, के. एस. देसाई, मुकुंद कोरे उपस्थित होते. कार्यक्रमास मराठा मंडळ संस्थेचे अध्यक्ष रविंद्र कदम, शिक्षण समितीचे चेअरमन राजेश कदम, ज्योती राजेश कदम यांचे मार्गदर्शन लाभले. संजय साखळकर यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta