हेस्कॉम अधिकारी पाटील : रयत संघटनेने मांडल्या व्यथा
निपाणी : दोन वर्षापासून अतिवृष्टी, महापूर आणि कोरोनामुळे चिक्कोडी तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशातच वारंवार वीज पुरवठा खंडित होणे, ऊसाला आग लागणे अशा घटनेमुळे शेतकरी हादरून गेला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकर्यांना तत्काळ नुकसानभरपाई देण्यासह शेतकर्यांच्या विविध समस्या मार्गी लावण्यासाठी विभागवार अधिकार्यांच्या बैठका घेणार असल्याची माहिती हेस्कॉमचे चिकोडी येथील अभियंते बी. बी. पाटील यांनी दिली. रयत संघटनेचे चिकोडी जिल्हा अध्यक्ष राजू पवार यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या पदाधिकार्यांनी अधिकार्यांची भेट घेऊन शेतकर्यांच्या व्यथा मांडल्या. त्यावेळी पाटील बोलत होते.
रयत संघटनेचे चिकोडी जिल्हा अध्यक्ष राजू पोवार यांनी, आतापर्यंत निपाणी आणि चिकोडी भागातील अनेक शेतकर्यांचा ऊस विद्युत्त वाहिनीच्या ठिणगीने पेटला आहे त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले. याबाबत मोर्चा आंदोलन करून ही आजपर्यंत शेतकर्यांना भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे तात्काळ भरपाई मिळाली पाहिजे. शेतातून गेलेल्या विद्युत्त वाहिन्या लोंबकळत असल्याने त्याचाही धोका शेतकर्यांना होऊ शकतो. याशिवाय बर्याचदा ट्रांन्सफार्मर जळाल्याने शेतकर्यांचा पाणी पुरवठा बंद होत आहे. त्यामुळे तात्काळ त्याची दुरुस्ती केली पाहिजे. फेब्रुवारीपासून उन्हाळ्याला प्रारंभ होणार आहे त्यामुळे पिकांना पाणी देण्यासाठी किमान आठ तास तरी थ्री फेज वीजपुरवठा करावा. सर्वसामान्य कुटुंबाची घरातील वीज बिले थकीत असून ती टप्प्याटप्प्याने भरून घ्यावीत. यासह अनेक समस्या मांडल्या.
हेस्कॉम अधिकारी पाटील यांनी सर्व समस्यांची माहिती घेऊन तात्काळ गावपातळीवर त्याचे निवारण करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी संघटनेचे निपाणी शहर अध्यक्ष उमेश भारमल, सेक्रेटरी भगवंत गायकवाड, बाळासाहेब हादिकर, बाळकृष्ण पाटील, तानाजी पाटील, सर्जेराव हेगडे, बाबासाहेब पाटील, नामदेव साळुंखे, कलगोंडा कोटगे, बबन जामदार, सुभाष नाईक, राजू नाईक, शरद भोसले, चीनु कुळवमोडे, पांडुरंग तोडकर, बाळासाहेब कांबळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Check Also
तवंदी घाटात भीषण अपघात: एकाचा मृत्यू, १५ गंभीर जखमी
Spread the love बेळगाव : पुणे – बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटात भरधाव वेगात आलेल्या …