लहान मुलांवर हल्ले वाढले : पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष
निपाणी (वार्ता) : येथील शहराबाहेरील रोहिणी नगरात दिवसेंदिवस डुकरांची संख्या वाढत आहे. त्यामुळे त्यांची दहशत पसरली असून लहान मुलांच्यावर आल्याच्या घटना वाढ होत आहे. याबाबत नगरसेविका उपासना गारवे आणि सामाजिक कार्यकर्ते सचिन गारवे यांनी नगरपालिका आयुक्त जगदीश हुलगेज्जी यांना डुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी करूनही काकडे दुर्लक्ष झाले आहे.
येथील रोहिणी नगरात भीमा शिक्रे या व्यक्तीने काही महिन्यापूर्वी सात ते आठ डुकरे सोडली होती. त्यानंतर सध्या या डुकरांची संख्या २५ वर पोहचली आहे. यामधील मोठी डुकरे लहान मुले व महिलांच्या अंगावर धावून जाऊन हल्ले करत आहेत. अशा घटना वाढत असल्याने याबाबत गारवे दाम्पत्यांनी नगरपालिका आयुक्त आणि आरोग्य विभागाचे अधिकारी विनायक जाधव यांच्याकडे पाच ते सहा वेळा तक्रार केली आहे. पण आज तागायत त्याची दखल न घेतल्याने वरील परिसरातील नागरिक भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. नगरपालिका प्रशासन संबंधित कंत्राटदारांना ताकीद करण्यास असमर्थ ठरले आहे. याउलट डुकरांची संख्या वाढत असल्याने यामागील गौडबंगाल काय? असा प्रश्नही सचिन गारवे यांनी उपस्थित केला आहे. तरी नगरपालिका प्रशासनाने तात्काळ या डुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.